पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'बळी' या मराठी भयपटात दिसणार स्वप्नील जोशी

बळी

स्वप्नील जोशीची प्रमुख भूमिका असलेला एक वेगळा विषय मांडणारा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'बळी’ असे या चित्रपटाचे नाव असून या सिनेमाचे पहिले पोस्टर  नुकतेच सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले आहे. 

हा चित्रपट २०२० साली प्रदर्शित होत आहे.  चित्रपटाचे दिग्दर्शन  सुपरहिट मराठी चित्रपट ‘लपाछपी’ फेम विशाल फुरिया यांनी केले आहे. या भयपटात  काम करण्यासाठी स्वप्नील देखील तितकाच उत्सुक आहे. 

मी चहा नाही कॉफीच पिते, अनुष्कानं टीकाकारांना केलं क्लीन बोल्ड

मराठी चित्रपटात विविध संकल्पना राबवल्या जात आहेत. प्रेक्षकांनाही त्याचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटातून मी भयपटाच्या क्षेत्रात पाऊल ठेवत आहे. माझ्या आवडीच्या लोकांसोबत चित्रपटामुळे काम करण्याची संधी मिळाली म्हणून मी खूपच खूश आहे. हा भयभट प्रेक्षकांना नक्कीच घाबरवून सोडेल अशी आशाही स्वप्नीलनं व्यक्त केली आहे. 

तब्येतीच्या कारणावरून बच्चन यांचे परदेशात कार्यक्रमास जाणं रद्द

‘जीसिम्स’चे अर्जुन सिंग बरान आणि कार्तिक निशाणदार यांनी 'बळी’ची निर्मिती केली आहे.