लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु आहे. मात्र लोकसभा निवडणूक न लढवणारी अभिनेत्री सनी लिओनी मात्र अचानक ट्विटरवर ट्रेंड होऊ लागली. एका खासगी वृत्तवाहिनेच्या निवेदकानं चर्चेदरम्यान गोंधळून भाजपाचे उमेदवार अभिनेते सनी देओलऐवजी बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीच्या नावाचा उल्लेख केला. या चर्चासत्रामधली व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली. सनीनंही ट्विट करत मी किती जागांवर आघाडीवर आहे असा मिश्कील प्रश्न विचारला.
Arnab is so excited today he goofed up Sunny Deol as Sunny Leone😂🤣😂#Verdict2019 #ElectionResults2019 pic.twitter.com/SBDt1DEDoE
— Sir Jadeja fan (@SirJadeja) May 23, 2019
एक वृत्तनिवेदक देशातील प्रमुख उमेदावार किती मतांनी आघाडीवर आहेत यासंदर्भात माहिती देत होता. तितक्यात त्या वाहिनीचे प्रमुख असणारे अर्नब गोस्वामी यांनी निवेदकाला मध्येच थांबवत ‘सनी लिओनी… सनी देओल हे ७ हजार ५०० मतांनी आघाडीवर आहेत’ असे ओरडले. हा व्हिडिओ सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाल्यानंतर अभिनेत्री सनी लिओनी अल्पावधित ट्विटरच्या ट्रेंडिंग लिस्टमध्ये आली.
Leading by How many votes ???? ;) 😜
— Sunny Leone (@SunnyLeone) May 23, 2019
तिनंही मग संधी न दवडता मी किती मतांनी आघाडीवर आहे? असा मिश्कील सवाल विचारला. विनोदाचं अचुक टायमिंग साधणाऱ्या सनीवर चाहतेही फिदा झाले.