पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोरोनाविरोधातील लढाईसाठी सनी देओलकडून ५० लाखांची मदत

अभिनेता आणि भाजप खासदार सनी देओल

कोरोनाविरोधात लढा देण्यासाठी सरकारकडून सर्वोतपरी प्रयत्न सुरु आहेत. अशामध्ये अनेक सेलिब्रिटींनी मदतीचा हात पुढे केला आहे. बॉलिवूड अभिनेते आणि भारतीय जनता पक्षाचे खासदार सनी देओल यांनी देखील कोरोनाविरोधातील लढाईसाठी आर्थिक मदत केली आहे. त्यांनी गुरुदासपूर लोकसभा मतदार संघातील लोकांसाठी ५० लाखांची आर्थिक मदत दिली आहे.

व्हेंटिलेटरची किंमत १० लाख रुपये, महिंद्रा बनवणार साडेसात हजारांत

सनी देओल यांनी ट्विट करत सांगितले की, 'कोरोना विषाणूचा सामना करताना माझ्या लोकसभा मतदार संघातील गुरुदासपूर आरोग्य विभागाला कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये यासाठी मी ५० लाखांची मदत करत आहे. त्याचसोबत सनी देओल यांनी गुरुदासपूर मतदारसंघातील सर्व नागरिकांना सरकारने दिलेल्या सूचनांचे पालन करा, गरज नसताना घराबाहेर पडू नका. जेणेकरुन आपण आणि समाज सुदृढ राहू शकेल, असे सांगितले.

कोरोना : CRPF कडून ३३ कोटी ८१ लाख रुपयांची मदत

दरम्यान, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २१ दिवसांच्या देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा केली. अशामध्ये बॉलिवूडमधील अनेक कलाकार कोरोना विषाणूबाबत जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहेत. तर काही जण आपल्या पद्धतीने शक्य होईल तेवढी आर्थिक मदत करण्यासाठी पुढे येत आहेत. 

मोठा निर्णय: राज्यातील जीवनावश्यक वस्तूंची दुकानं २४ तास सुरु राहणार