पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

जान्हवीच्या कपड्यांवरून कतरिनाची शेरेबाजी, सोनम म्हणते..

जान्हवी कपूर सोनम कपूर

जान्हवी कपूर परिधान करत असलेल्या अत्यंत तोकड्या शॉर्ट्स पाहून मला  कधी कधी तिची खूपच काळजी वाटते असं नुकतंच कतरिना कैफ एक चॅट शोमध्ये म्हणाली होती. त्यानंतर जान्हवीची चुलत बहिण अभिनेत्री  सोनम कपूरनं  इन्स्टाग्रामवर जान्हवीचा तोकड्या कपड्यातील एक फोटो शेअर केला.  कधी कधी तोकड्या कपड्यांपेक्षा  ती वेगळे कपडेही घालते असं सोनमनं आपल्या ट्विटमध्ये म्हटलं. हा  टोला सोनमनं  कतरिनाला लगावला अशा चर्चा होत्या मात्र सोनमनं  ट्विट करत हा टोला कतरिनाला नसल्याचं म्हटलं आहे.

'जान्हवीच्या कपड्यांवरून माझी जवळची मैत्रीण कतरिना अत्यंत निरागसपणे म्हणाली  होती. त्यावरून मी जान्हवीची पाठराखण  केली नाही, मी जे पोस्ट केलं ती माझ्या बहिणीसोबत केलेली छोटीशी थट्टा होती.' असं सोनमनं म्हटलं आहे. 

नेहा धुपियाच्या  बीएफएफ विथ वोग चॅटशोमध्ये  कतरिना आली होती यावेळी तिनं जान्हवी परिधान करत असलेल्या तोकड्या कपड्यांवरून काळजी व्यक्त केली होती. कोणत्या अभिनेत्रीचा जिम लूक तुला आवडतो असा प्रश्न कतरिनाला नेहानं विचारला होता. यावर  'मी ज्या जिममध्ये जाते त्या जिममध्ये जान्हवी येते, आम्ही कधीतरी एकत्रही असतो. जान्हवी परिधान करत असलेल्या अत्यंत तोकड्या शॉर्ट्समुळे मला तिची कधी कधी खूप काळजी वाटते.',असं कतरिना म्हणाली होती. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Actor Sonam Kapoor has offered a clarification on her recent comments defending cousin Janhvi Kapoor