पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

वयानं मोठ्या असलेल्या सलमानच्या आईची भूमिका साकारण्याविषयी सोनाली म्हणते...

सलमान खान सोनाली कुलकर्णी

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनं आपल्या अभिनयानं मराठी चित्रपटसृष्टी  आणि रंगभूमीवर स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. मराठी सिने आणि नाट्य क्षेत्रात तिने दिलेल्या योगदानाबद्दल तिला अनेक पुरस्कारानं गौरवण्यात आलं आहे. नुकतीच सोनाली  'भारत' या सलमानच्या चित्रपटात दिसली. या चित्रपटात ४४ वर्षांच्या सोनालीनं ५३ वर्षांच्या सलमानच्या आईची भूमिका साकारली आहे. अभिनेत्याचं वय वाढलं तरी तो चित्रपटाचा प्रमुख नायकच असतो, मात्र अभिनेत्रीचं वय वाढलं की त्या आई, बहिण अशा भूमिकांमध्ये दिसू लागतात. अर्थात वयानं मोठ्या असलेल्या सलमानच्या आईच्या भूमिकेत तिनं दिसणं अनेकांना खटलं. काहींनी अभिनेत्रीसोबत केला जाणारा हा दुजाभाव आहे असं म्हणत काळजीही व्यक्त केली.  मात्र सोनालीला हा दुजाभाव वाटत नाही. 

भेरी भेल डन !, लंडनमधल्या परदेशी भेळवाल्याचं बिग बींकडून कौतुक

'मी जी भूमिका साकारतेय ती मी निवडली आहे आणि मला माझ्या निवडीबद्दल अभिमान आहे. लोकांनी काळजी व्यक्त केली मला मान्य आहे पण  मिशन काश्मीर या चित्रपटात देखील मी हृतिक रोशनच्या आईच्या भूमिकेत होती. प्रेक्षकांना आपलं मत मांडण्याचा हक्क आहे. प्रत्येक वेळी लोक टीकास्त्र सोडतात असं नाही कधीकधी ते काळजीही व्यक्त करतात.

मराठी चित्रपटात मला खूप चांगल्या आणि वेगळ्या भूमिका मिळाल्या मात्र हिंदीत मला वाव मिळाला नाही असं लोक अनेकदा मला सांगतात. मी त्यांच्या मताशी सहमत आहे, मात्र त्याचबरोबर मी जास्त अपेक्षा करू शकत नाही हेही तितकंच खरं. मला जे काम मिळतंय त्यात मी समाधानी आहे. असंही ती म्हणाली. 

Video : आयुष्यावर प्रेम करायला लावणारा 'स्माईल प्लीज'
 

तिनं सलमान खानसोबत काम करताना  आलेला अनुभवही सांगितला. मी पहिल्यांदाच सलमानसोबत काम करत होते. मी त्याच्याविषयी बरंच ऐकलं होतं त्यामुळे थोडं दडपण होतंय. मात्र सलमाननं माझ्या मनावरचं दडपण खूपच कमी केलं. सलमान एक  मोठ्या मनाचा व्यक्ती आहे. स्वत: सुपरस्टार असूनही त्याचा अहंकार कधीही मनात ठेवला नाही असंही सोनाली म्हणाली.