पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'शिवाजी नाही छत्रपती शिवाजी महाराज म्हणा'

अभिनेता शरद केळकर

अजय देवगनची मुख्य भूमिका असणाऱ्या 'तान्हाजी: द अनसंग वॉरियर' या चित्रपटात अभिनेता शरद केळकर छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. ट्रेलर प्रदर्शनानंतर आयोजित केलेल्या परिषदेत छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख करणाऱ्या पत्रकाराला शरदनं चूक दाखवून दिली. तसेच महाराजांचा एकेरी  उल्लेख करणाऱ्या पत्रकारास शरदनं  'छत्रपती शिवाजी महाराज' म्हणा अशी नम्रविनंती केली. 

रानू यांच्या मेकओव्हरचं अनेक नेटकऱ्यांकडून समर्थन

 महाराजांप्रतीचा शरद केरळकरचा आदार पाहून अनेकांनी टाळ्या वाजवून त्याचे कौतुक केलं. सोशल मीडियावरही शरदच खूपच कौतुक होत आहे. 'तान्हाजी: द अनसंग वॉरियर'मध्ये अजय देवगन तान्हाजी मालुसरेंच्या भूमिकेत आहे. शरद केरळकर महाराजांची आणि सैफ अली खान उदयभानच्या भूमिकेत आहे. 

सत श्री अकाल जी, लाल सिंह चड्ढा आलाय भेटीला

काही दिवसांपूर्वी महाराजांच्या वेशातील शरद केरळकरचा फर्स्ट लूक सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला. १० जानेवारी २०२० मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. 

आठवड्याभरानंतर लता मंगेशकर यांची प्रकृती पूर्वीपेक्षा ठिक