पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आर्थिक मदतीनंतर शाहरुखने क्वारंटाईनसाठी दिली कार्यालयीन इमारत

शाहरुख खान

कोरोनाच्या संकटातून देशाला वाचवण्यासाठी बॉलिवूडचा किंग खान शाहरुखने केंद्र सरकारसह राज्य सरकारला आर्थिक मदत जाहीर केली आहे. त्यानंतर आता शाहरुख खान आणि त्याची पत्नी गौरी खानने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. कोरोनाविरोधातील लढाईसाठी  शाहरुख खान आणि गौरी खानने क्वारंटाईनसाठी आपल्या कार्यालयाची चार मजली इमारत देण्याचा निर्णय घेतला आहे. 

कोरोनाशी लढा: रणवीर-दीपिकाकडून पीएम केअर्स फंडासाठी मदत

मुंबई महानगर पालिकेने शनिवारी याबाबत ट्विट करत माहिती दिली. शाहरुख खानने वांद्रे येथे असलेली चार मजली कार्यालयीन इमारत क्वारंटाईनसाठी देण्याचा निर्णय घेतला आहे. याठिकाणी महिला, मुलं आणि वयोवृद्धांवर उपचार केले जाणार आहे. मुंबई महानगरपालिकेने शाहरुख खान आणि गौरी खान यांच्या या निर्णयाबद्दल त्यांचे आभार मानले आहे. 

डिसेंबरच्या या तारखेला रणबीर -आलिया अडकणार विवाहबंधनात?

याआधी, शाहरुख खानने महाराष्ट्र, दिल्ली आणि कोलकाता सरकारला आर्थिक मदत जाहीर केली. शाहरूख त्याच्या कोलकाता नाइट रायडर्स, रेड चिलिज इंटरटेन्मेंट, रेड चिलिज VFX आणि मीर फाऊंडेशन मार्फत पीएम केअर फंड आणि मुख्यमंत्री सहायत्ता निधीसाठी आर्थिक मदत करणार आहे. त्याचसोबत हेल्थ केअर वर्कर्सच्या मदतीसाठी आणि सुरक्षेसाठी ५० हजार पीपीई उपलब्ध करुन देणार आहे. तसंच मुंबईतील साडेपाच हजार कुटुंबीयांना जेवण आणि साडेपाच हजार कुटुंबीयांना एका महिन्यासाठी अन्न पुरवणार आहे. 

तापसी म्हणजे ब दर्जाची मिमिक्री आर्टिस्ट, कंगनाच्या बहिणीच्या पुन्हा 'पंगा'

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:actor shah rukh khan and gauri khan offer four storey office to bmc to expand quarantine capacity