पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

विवेकच्या 'त्या' ट्विटवर सलमान खान म्हणतो...

विवेक-  सलमान खान

अभिनेता सलमान खान आणि विवेक ओबेरॉय यांचा वाद हा सर्वश्रुत आहे. विवेकनं मंगळवारी सोशल मीडियावर आक्षेपार्ह ट्विट शेअर करून पुन्हा एकदा वादाची ठिणगी पेटवली. या ट्विटमुळे विवेक सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या टिकेचा धनी ठरला. आधी या ट्विटवरून माफी मागायला नकार देणाऱ्या विवेकनं  नंतर  मात्र जाहीर माफी मागितली. या ट्विटवर अभिनेता सलमानही व्यक्त झाला आहे. 

मी काम करू की ट्विटवर येणाऱ्या लोकांच्या प्रतिक्रिया वाचू असं सलमान म्हणाला. हिंदूस्थान टाइम्सच्या वृत्तानुसार  सलमान खाननं  विवेकच्या  मीम्सकडे दुर्लक्ष करणं  पसंत केलं आहे. पहिल्यासारखं  मी ट्विटच करत नाही तर मीम्स पाहण्याचा प्रश्न येत नाही. मी काम करू  की लोकांच्या प्रतिक्रिया पाहू? मी  आजकाल या गोष्टींकडे अजिबातच लक्ष देत नाही असं सलमान म्हणाला. 

'सोनम मेकओव्हर करत होती तेव्हा मी महिला सबलीकरणावर काम करत होतो'

निवडणुकांचे कल हे ऐश्वर्या सलमानच्या नात्यासारखे  असतात, एक्झिट पोल हे ऐश्वर्या आणि विवेकच्या नात्यासारखे असतात तर मतदानाचे निकाल हे अभिषेक ऐश्वर्याच्या नात्यासारखे असतात, असे वादग्रस्त मीम्स विवेकनं शेअर केले होते. या ट्विटनंतर सर्व स्तरांतून त्याच्यावर कडाडून टीका झाली. अखेर मंगळवारी सकाळी त्याने पुन्हा एक ट्विट करून घडल्या प्रकाराबद्दल माफी मागितली. जर ते मीम शेअर करण्यामुळे एकाही महिलेला अपमानास्पद वाटले असेल तर मी त्याबद्दल माफी मागतो, अशा आशयाचे ट्विट करत त्यानं जाहीर माफी मागितली.