पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ऋषी कपूर यांनी केले खास फोटोशूट; चाहत्यांची मिळतेय पसंती

ऋषी कपूर

कर्करोगाशी यशस्वी लढा देऊन न्यूयॉर्कवरुन भारतात परतलेले बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांनी खास फोटोशूट केले आहे. प्रसिध्द फोटोग्राफर अविनाश गोवारीकर यांच्याकडून त्यांनी हे फोटोशूट करुन घेतले आहे. अविनाश यांनी त्यांचा एक फोटो त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे. ऋषी कपूर यांच्या या फोटोला त्यांच्या चाहत्यांनी खूप पसंती दिली आहे. त्याचे हे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

विंग कमांडर अभिनंदन यांच्या स्क्वॉड्रनचा हवाईदलाकडून सन्मान

अविनाश गोवारीकर यांनी फोटो पोस्ट करत त्याला एक छान कॅप्शन दिले आहे. त्यामध्ये त्यांनी असे म्हटले आहे की, 'छोट्याशा विश्रांतीनंतर ऋषी कपूर पुन्हा सज्ज झाले आहेत. चिंटूजीं पुन्हा एकदा कॅमेऱ्यातून पाहण्याचा आनंद मी शब्दात व्यक्त करु शकत नाही', असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

सैन्य दलाच्या त्रासाला कंटाळून चंदू चव्हाणने दिला राजीनामा

दरम्यान, ऋषी कपूर यांनी देखील तोच फोटो त्यांच्या इन्स्टावर शेअर करत अविनाश गोवारीकर यांचे आभार मानले आहेत. त्यांनी असे म्हटले आहे की, ' धन्यवाद अविनाश, तुम्ही सर्वात जास्त कौतुक केले. पॅक अपनंतर जवळपास दोन महिन्यानंतर वाढलेली दाढी कापली. आज रात्री इटलीला जात आहे. परत आल्यानंतर तुम्हाला भेटतो.'