पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

राणीला 'हिचकी'साठी विशेष पुरस्कार

हिचकी

बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जीला दक्षिण-पूर्व आशिया अवॉर्ड सोहळ्यात चित्रपटातील सर्वात प्रभावशाली व्यक्तीमत्त्व म्हणून गौरवण्यात आलं. २०१८ साली प्रदर्शित झालेल्या 'हिचकी' चित्रपटातील भूमिकेसाठी तिला गौरवण्यात आलं. 

फत्तेशिकस्त! स्वराज्याच्या शत्रूवर महाराजांचा सर्जिकल स्ट्राइक

अभिनेत्री राणीचा 'हिचकी' हा भारतानंतर अनेक देशांत प्रदर्शित करण्यात आला. काही चित्रपट महोत्सवातही या चित्रपटाचं प्रदर्शन करण्यात आलं. या चित्रपटानं जगभरात २५० कोटींची कमाई केली. या चित्रपटात भूमिका साकारण्याची संधी मिळाली, याचा आनंद राणीनं व्यक्त केला आहे. 

महिला केंद्रीत चित्रपटासाठी पैसे मिळवण्यात अडचणी, जॉनची खंत

हिचकी चित्रपटात राणीनं शिक्षिकेची भूमिका साकारली आहे. स्वत:च्या समस्यांवर मात करून गरीब मुलांच्या आयुष्याला कलाटणी देणाऱ्या शिक्षिकेची ही गोष्ट अनेकांना भावली.