पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोरोना विषाणू : मुंबई विमानतळावर मास्क घालून आला हा अभिनेता

रणबीर कपूर

कोरोना विषाणूमुळे जागतिक आरोग्य संघटनेनं आरोग्य आणीबाणी जाहीर केली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत चीनमध्ये २०० हून अधिक बळी गेले आहेत, जवळपास १७ देशात या विषाणूंची लक्षणं आढळली आहेत. भारतात केरळमध्ये पहिला कोरोनाचा रुग्ण आढळला आहे. तर मुंबईत ६  कोरोनाचे संशयित आहेत. प्रत्येकाला आरोग्याची काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं  आहे, बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरही मास्क परिधान करून मुंबई विमानतळावर आलेला दिसला. 

'गंगूबाई काठीयावाडी' मध्ये DID मधल्या या डान्सरची वर्णी?

'लवकरच प्रत्येकजण मास्क घालूनच वावरेल' असं तो म्हणाला. यापूर्वी अभिनेत्री सनी लिओनीनं देखील मास्क घालून  आरोग्याची काळजी घेण्याचं आवाहन सर्वांना केलं होतं. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

#ranbirkapoor today at the airport #airportdiaries #CoronaVirus #safetyfirst #viralbhayani @viralbhayani

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

चीनमध्ये कोरोना विषाणूची लागण झालेले रुग्ण सर्वाधिक आहेत. आतापर्यंत चीनमध्ये २१३ जणांचा बळी या आजारामुळे गेला आहे. चीनमधील हुबेई प्रांतात आणि त्याची राजधानी वुहानमध्ये या आजाराचा सर्वात जास्त फैलाव झाला आहे. या प्रांतात आणीबाणीची स्थिती आहे. मुंबई विमानतळावर गेल्या नऊ दिवसांत चीनमधून आलेल्या प्रत्येक प्रवाशाची तपासणी केली जात आहे.  जवळपास ४ हजार प्रवाशांची तपासणी केली जात आहे.

अक्षयवर चित्रपटांचा पाऊस, २०-२१ मध्ये प्रदर्शित होणार हे चित्रपट