पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

वेबसीरिजमध्ये प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी अश्लील दृश्यांचा भरणा, अभिनेत्याची टीका

अभिनेता मनोज बायपेयी

वेबसीरिजमध्ये अधिकाधिक प्रेक्षकांना आकर्षित करून घेण्यासाठी त्यात अश्लील  आणि हिंसक दृश्यांचा भरणा असतो अशी टीका अभिनेता मनोज बायपेयी यांनी केली आहे. डिजिटल व्यासपीठाला स्वातंत्र्य देण्यात आलं आहे, मात्र निर्माते याचा गैरवापर करत असल्याचं  बायपेयी यांचं म्हणणं आहे. 

डिजिटल व्यासपीठावर सर्जनशिलतेला बराच वाव असतो, स्वातंत्र्य दिलं जातं. या स्वातंत्र्याचा जबाबदारीनं  वापर केला पाहिजे. मात्र असं न होता  निर्माते प्रेक्षकांना अधिकाधिक आकर्षित करण्यासाठी अश्लील आणि हिंसक दृश्यांचा वापर करत आहेत. या गोष्टींची आवश्यकता नसतानाही त्या वापरल्या जात आहेत. मला या गोष्टी मान्य नाहीत असं मनोज आयएएनएसला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले. 

बिग बॉस मराठी : या कारणासाठी परागचा आहे किशोरीताईंनाच पाठिंबा

दिग्दर्शकांनीच पुढाकार घेऊन याला सेन्सॉर लावला पाहिजे असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते मनोज बाजपेयी हे लवकरच नेटफ्लिक्सच्या मिस सीरिअल किलर या चित्रपटात दिसणार आहे. त्याचबरोबर अॅमेझॉन प्राइमच्या द फॅमेली गायमध्येही ते दिसणार आहे. 

कोल्हापूर, सांगली पूरग्रस्तांसाठी नागराज मंजुळेंची ५ लाखांची मदत

 वेब सीरिजमधील अश्लील दृश्यांवर आक्षेप घेणारे मनोज हे पहिलेच अभिनेते नाही यापूर्वी अभिनेता सलमान खाननं देखील ओटीटी प्लॅटफॉर्मवर दाखवण्यात येणाऱ्या दृश्यांवर आक्षेप घेतला होता. यामध्ये दाखवण्यात आलेल्या अश्लील दृश्यांवर  कात्री लावलीच पाहिजे असं सलमानचं म्हणणं होतं. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:actor Manoj Bajpayee has said that he is against the use of sex and violence in web series