पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बेक्रअपनंतर आईनं दिलेला सल्ला कामी आला- कतरिना

कतरिना कैफ

अभिनेत्री कतरिना कैफ आणि रणबीर कपूर यांची 'अजब प्रेम की गजब कहानी'पासून सुरू झालेली प्रेमकहाणी  'जग्गा जासूस'च्या चित्रीकरणापर्यंत पूर्णपणे संपली  होती. बॉलिवूडमधलं एकेकाळचं लोकप्रिय जोडपं म्हणून रणबीर कतरिनाची जोडी ओळखली जायची. एकमेकांच्या प्रेमात त्यावेळी आकंठ बुडालेल्या या दोघांच्या प्रेमकहाणीचा अंत मात्र वाईट झाला. बेक्रअपनंतर काही काळ आपण  नैराश्येत गेलो होतो मात्र आईचा सल्ला तेव्हा कामी आला आणि मी जगण्याचा दृष्टीकोन बदलला असं कतरिना म्हणाली. 

बेक्रअपनंतर मला त्रास होत होता. हे सत्य मी कधीही नाकारलं नाही मात्र त्यावेळी आईनं मला सांगितलेलं वाक्य आठवलं.  हे वाक्य आजही माझ्या मनावर कोरलं  आहे. 'हृदयभंगाचा अनुभव फक्त तुलाच आला असं समजू नकोस, आज जगात अशा अनेक महिला तरूणी आहेत ज्या याच अनुभवातून जात आहेत. त्यामुळे तू कधीही स्वत:ला एकटं समजू नकोस' असं आई म्हणाली  होती.  या वाक्यानं  मला विचार करायला भाग पाडलं. माझं दु:ख कुरवाळत बसण्यापेक्षा मी  आयुष्याकडे नव्या पद्धतीनं बघायला  शिकले असं ती कतरिना 'मुंबई मिरर'ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली. 

 कतरिनाला डेट करण्यापूर्वी रणबीर अभिनेत्री दीपिका पादुकोनला डेट करत होता. तर कतरिनाशी बेक्रअप झाल्यानंतर तो कतरिनाची जवळची मैत्रीण आलिया भट्टलाही डेट करू लागला. कतरिना चित्रपट सृष्टीत एक दशकाहून अधिक काळ आहे.  आलिया सोडली तर बॉलिवूडमधल्या कोणत्याच अभिनेत्रीची तिची घट्ट मैत्री नव्हती. मात्र आलिया आणि रणबीरच्या रिलेशनशिपमध्ये दोघींच्या मैत्रीत दुरावा आल्याचं म्हटलं जात आहे.