पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

शोले चित्रपटातील अभिनेत्री गीता सिद्धार्थ काक यांचं निधन

दिवंगत गीता सिद्धार्थ काक

शोले चित्रपटातील ओळखीचा चेहरा आणि ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेत्री गीता सिद्धार्थ काक यांचे शुक्रवारी रात्री मुंबई येथे निधन झाले आहे. गीता काक यांना १९७३ मध्ये आलेल्या एम एस सथ्यू यांच्या 'गरम हवा' या कलात्मक चित्रपटातील अभिनयासाठी ओळखले जाते.

गीता यांनी गुलजार यांच्या १९७२ मध्ये आलेल्या परिचय या चित्रपटातून आपल्या अभिनयाच्या कारकीर्दीस सुरुवात केली होती. या चित्रपटात जितेंद्र आणि जया भादुरीसारखे कलाकार होते. त्या ७० आणि ८० च्या दशकातील बॉलिवूडमध्ये लोकप्रिय होत्या. गीता यांनी शोले, त्रिशूल, डिस्को डान्सर, राम तेरी गंगा मैली, शौकिन, अर्थ, एक चादर मैली सी, गमन आणि दुसरा आदमी सारख्या चित्रपटात काम केले. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

. #GitaSiddharth #ParveenBabi #NavinNischol in #DeshPremee (1982) . Follow 👉 @evergreenbollywood For more posts

A post shared by Evergreen Bollywood (@evergreenbollywood) on

त्यांनी टेलिव्हिजन निवेदक-निर्माता आणि माहितीपट निर्माता सिद्धार्थ काक यांच्याशी विवाह केला होता. सिद्धार्थ काक हे सुरभी या छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रमासाठी ओळखले जातात. हा कार्यक्रम १९९० ते २००१ पर्यंत दूरदर्शनवर प्रसारित झाला. गीता या कार्यक्रमाच्या काल दिग्दर्शक होत्या.

गाती आणि सिद्धार्थ काक यांची मुलगी अंतरा याही माहितीपट निर्मात्या आहेत. गीता या अभिनयाव्यतिरिक्त सामाजिक कार्यातही सक्रिय होत्या.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Trishul May 5, 1978. Rishi Kapoor was offered Sachin's role in Trishul but he refused the offer. The decline shocked Salim Khan and Javed Akhtar, who told him that refusing the role would, ruin his career because they were a big name in the film industry and the role had been tailored made for him! Even though he declined the role he still showed up to the first shot of the film; maybe to cheer on uncle, Shashi? - Rishi mentioned in his autobiography. . . Seen here at the mahurat shot of the film Trishul are Yash Chopra, Randhir Kapoor, Shashi Kapoor, Poonam Dhillon, Amitabh Bachchan, Gita Siddharth, Sanjeev Kumar and Rishi Kapoor on January 3, 1977. @amitabhbachchan @chintskap @poonam_dhillon_ @yrf #trishul #yashchopra #yrf #amitabhbachan #sanjeevkumar #shashikapoor #sachin #waheedarehman #raakhee #rakheegulzar #hemamalini #poonamdhillon #premchopra #gitasiddharth #salimjaved #gulshanrai #bollywood #classicfilms #hindifilms #retrobollywoood #rishikapoor #102notout #mahuratshot

A post shared by @ retrobollywood on