पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Cannes 2019 : परी म्हणू की अप्सरा, रेड कार्पेटवर दीपिकाची मोहिनी

दीपिका पादुकोन कान

कानच्या  रेड कार्पेटवर अभिनेत्री दीपिका पादुकोन अवतरली अन् तिला परी म्हणावं की अप्सरा असं जणू तिच्या चाहत्यांचं झालं होतं. यंदाच्या रेड कार्पेटवर दीपिका पादुकोनची मोहिनी पहायला  मिळाली. मागील काही वर्षांपासून दीपिका एका सौंदर्य प्रसाधन  कंपनीची सदिच्छा दूत म्हणून या सोहळ्यासाठी उपस्थिती लावत आहे.

कान फिल्म फेस्टिव्हलच्या दुसऱ्या  दिवशी दीपिकाची पाच वेगवेगळी रुपं पाहायला  मिळाली. दीपिकानं आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलेले हे पाचही लूक एकापेक्षा एक  हटके असेच होते.  एका रूपाची भुरळ पडत नाही तोच तिनं दुसरा,  तिसरा करत पाच लूक आपल्या सोशल मीडियावर शेअर केले.  या पाचही लूकनं तिनं चाहत्यांनाच नाही तर  फॅशन विश्वातील अनेक मंडळींनाही प्रभावीत केलं. तिचा पहिला लूक होता निळ्या पांढऱ्या रंगातला  पँट सूट, या लूकमध्ये ती एखाद्या लेडी बॉस प्रमाणे दिसत होती असं कौतुक तिचा पती रणवीर सिंगनं केलं. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

day 2, look 1... #Cannes2019 @loewe

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone) on

दुसऱ्या लूकसाठी तिनं निऑन  ग्रीन चित्ता  प्रिटं आणि काळ्या रंगातील ड्रेसची निवड केली. या ड्रेसवर तिनं मॅचिंग निऑन ग्रीन हँडबॅग आणि निऑन ग्रीन फ्रेम असलेले सन ग्लासेस परिधान केले होते.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

day 2, look 2... #cannes2019 @off____white

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone) on

तिसऱ्या लूकसाठी  तिनं Philosophy di Lorenzo Serafini कलेक्शनमधल्या  लेस टॉपची निवड केली. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

day 2, look 3... #Cannes2019 @philosophyofficial

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone) on

चौथा लूक हा फ्लोरल गाऊनचा होता. तिनं हा फोटोही आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

day 2, look 4... #cannes2019 @erdem

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone) on

मात्र सर्वांना तिचा शेवटचा लूक आवडला. रेडकार्पेटसाठी तिनं giambattistavalliparis कलेक्शनमधल्या पोपटी गाऊनची निवड केली होती. 

या लूकची प्रशंसा चाहत्यांनीच नाही तर अनेक आंतरराष्ट्रीय फॅशन मासिकानंही केली.