पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'भारत'मधील हा कलाकार पोटापाण्यासाठी 'डीलिव्हरी बॉय' म्हणून करतो काम

चेतन राव

चेतन राव,  आज कदाचित तो 'डीलिव्हरी बॉय'म्हणून काम करतोय मात्र भविष्यात तो नक्की एक सुपरस्टार होईन अशी आशा अनेकांनी व्यक्त करत त्याला शुभेच्छा दिल्या आहे. 'भारत' चित्रपट 'दिल्ली क्राईम' सारख्या वेबसिरिजमध्ये छोट्या भूमिकेत चेतन दिसला. त्याला अभिनयाची प्रचंड आवड आहे.  अभिनयात करिअर करून सूपरस्टार होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या  हजारो तरूणांपैकी तो एक. मात्र  त्याच्यासाठी 'मंझिल अभी बहौत दूर है'.  आपल्या आवडीनं तो पूर्णपणे झपाटला आहे मात्र प्रश्न पोटापाण्याचाही आहे ही सत्य परिस्थिती त्याला ठावूक आहे. म्हणूनच जेव्हा काम मिळत नाही तेव्हा पोटापाण्यासाठी चेतन एका फूड डीलिव्हरी कंपनीसाठी 'डीलिव्हरी बॉय' म्हणून काम करतो. 

नेटफ्लिक्सवर काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या 'दिल्ली क्राईम' या वेबसीरिजमध्ये तो अगदी छोट्या भूमिकेत होता. याच सीरिजमध्ये पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत असलेल्या एका कलाकारानं चेतनबद्दल ट्विट केलं होतं. चेतन हा अभिनेता आहे, मात्र  जेव्हा काम मिळत नाही तेव्हा पोटापाण्यासाठी तो हे कामही करतो असं कलाकार राजेश तेलंग यानं ट्विट केलं होतं. तेव्हापासून चेतन हा चर्चेत आहे. 

राजेश सध्या दिल्लीत राहत आहे. मला छोट्या भूमिका सहज मिळतात. या भूमिका २ ते ३ मिनिटांच्या असतात. भूमिका किती लहान किंवा किती मोठी हे महत्त्वाचं नाही, माझी कला आवड जोपासायची संधी मला त्यातून मिळते हे सर्वात महत्त्वाचं असं राजेश 'हिंदुस्थान टाइम्स'शी बोलताना म्हणाला. 

 छोट्या भूमिकातून मिळणारे पैसे हे खर्चासाठी पुरेसे नसतात म्हणून मला हे काम करावं लागतं चेतन सांगत होता. मी अनेक छोट्या भूमिका केल्या आहेत. छोट्या भूमिका करूनही मी प्रेक्षकांच्या लक्षात आहे यापेक्षा दुसरी आनंदाची बाब असूच शकत नाही. अनेकदा लोक ओळखतात, विचारपूस करतात, आनंद वाटतो चेतन भावूक होऊन सांगत होता. 

आता मी  'डीलिव्हरी बॉय' म्हणून  काम करतोय पण एक दिवस माझ्या मेहनतीनं मी नक्की  सूपरस्टर होणार असा विश्वास चेतननं व्यक्त केला.