पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'पती, पत्नी वो'मधल्या वैवाहिक बलात्कारच्या संवादासाठी भूमी पेडणेकरची माफी

भूमी पेडणेकर

अभिनेता कार्तिक आर्यन, भूमी पेडणेकर आणि अनन्या पांडे यांची प्रमुख भूमिका असलेल्या 'पती, पत्नी और वो' चा ट्रेलर प्रदर्शित झाला. या चित्रपटात कार्तिकच्या तोंडी असलेल्या वैवाहिक बलात्कारच्या संवादामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. अनेकांना हा संवाद खटकला, चित्रपटामध्ये असे संवाद हे महिलांचा अपमान करणारे आहेत असंही मत अनेकांनी व्यक्त केलं.  

गरीब मुलांना मदत करतानाचे माझे फोटो काढू नका, जान्हवीची विनंती

या संवादासाठी अभिनेत्री भूमी पेडणेकरनं माफी मागितली आहे. आमच्याकडून कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर आम्ही मनापासून माफी मागतो. कोणालाही दुखावण्याचा आमचा हेतू नव्हता. आम्ही अशा प्रकारच्या विचारांचं कधीही समर्थन  करत नाही असं भूमी झूम टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली. 

लहान मुलाविरोधात अपशब्द काढणाऱ्या स्वरा भास्करविरोधात तक्रार दाखल

'पती, पत्नी और वो' चित्रपटात कार्तिकच्या तोंडी वैवाहिक बलात्कारवर एक संवाद आहे. जो ट्रेलरमध्येही दाखवण्यात आला आहे. ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर अनेकांनी या संवादाविरोधात आक्षेप नोंदवला. हा संवाद आता चित्रपटातून पूर्णपणे वगळण्यात येणार असल्याचं समजत आहे. 
 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Actor Bhumi Pednekar has apologised for the controversial dialogue on marital rape in Pati Patni Aur Woh