पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अभिनेता आयुष्मान खुराना लालबागच्या राजाच्या चरणी

आयुष्मान खुराना

मुंबईतील प्रसिद्ध गणेश मंडळांपैकी एक असणाऱ्या लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी अभिनेता आयुष्मान खुरानादेखील पोहोचला. दरवर्षी लाखो लोक लालबागच्या दर्शनाला येतात. लालबागच्या राजावर असणारी लाखो भक्तांची श्रद्धा त्यांना दरवर्षी येथे घेऊन. या भक्तांमध्ये अगदी सर्वसामान्यांपासून ते राजकारण्यांपर्यंत आणि बॉलिवूड सेलिब्रिटींपासून ते क्रिकेटर्सपर्यंत सर्वांचा समावेश आहे. 

जान्हवी - कार्तिकसोबत हा टीव्ही अभिनेता 'दोस्ताना २'मध्ये

बॉलिवूडमधले सेलिब्रिटी आवर्जून दर्शनासाठी येतात, यात आयुष्मान खुराना मागे कसा राहिन. आयुष्माननं देखील लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं. गेले ११ वर्ष मी मुंबईत राहत आहे. या वर्षांत पहिल्यांदाच मी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं असं आयुष्माननं आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

आमिर खानने मागितली माफी, नेटिझन्सनी उडविली खिल्ली

आयुष्मनासाठी २०१८ वर्ष खूप खास ठरलं. त्याचे २०१८ साली प्रदर्शित झालेले 'अंधाधून' आणि 'बधाई हो' दोन्ही चित्रपट सुपरहिट ठरले. 'अंधाधून'ला यंदाचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला. चीनमध्ये 'अंधाधून'नं तर ३०० कोटींहून अधिकची कमाई केली. हा चित्रपट दक्षिण कोरियातही प्रदर्शित झाला. यावर्षी प्रदर्शित झालेला 'आर्टिकल १५' हा देखील सुपरहिट ठरला. त्याला मिळालेल्या यशाबद्दल आभार मानन्यासाठी तो बाप्पांच्या दर्शनासाठी पोहोचला होता.