पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पैशांसाठी ट्रेनमध्येही गायचा आयुष्मान खुराना

आयुष्यमान खुराना

आयुष्यमान खुरानानं २०१८ या वर्षांत बॉलिवूडमध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. त्याची प्रमुख भूमिका असलेल्या 'अंधाधून'ला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला. त्याचा 'बधाई हो' देखील खूप लोकप्रिय ठरला. चीनमध्ये तर आयुष्मानच्या 'अंधाधून'नं ३०० कोटींहून अधिकची कमाई केली.

..तर आमिरऐवजी 'मोगुल'मध्ये कपिल शर्मानं साकारली असती गुलशन कुमार यांची भूमिका

लवकरच आयुष्मानचा 'ड्रिम गर्ल' चित्रपटही प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये  आयुष्मान व्यग्र आहे. प्रमोशनसाठी आयुष्माननं दी कपिल शर्मा शोमध्ये उपस्थिती लावली. यावेळी पैसे कमावण्यासाठी तू खरंच ट्रेनमध्ये गायचा का? असा प्रश्न त्याला कपिलनं विचारला. 

‘वेडिंगचा शिनेमा’नंतर सलील कुलकर्णींचा ‘एकदा काय झालं’ हा नवा चित्रपट

आयुष्यमाननं याला दुजोरा दिला. कॉलेजमध्ये असताना मी ट्रेनमध्ये गाणं गायचो. माझ्यासोबत मित्रही असायचे आम्ही चंडीगढ़ इंटरसिटीच्या सेकंड क्लासच्या डब्यात शिरुन गाणी गायचो. काही लोकांना आमचं गाणं आवडायचं ते आम्हाला पैसेही द्यायचे. एका दिवसात गाणं गाऊन आम्ही १ हजार रुपयेही कमावले होते. कधी कधी ते पैसे साठवून आम्ही गोव्यालाही जायचो असाही किस्सा आयुष्माननं सांगितला.