पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

भावालाही मुख्य भूमिका मिळायला हवी, आयुष्मानची इच्छा

आयुष्मान खुराना- अपारशक्ती खुराना

बॉलीवूडमध्ये सध्या आयुष्मान खुराना आणि त्याचा भाऊ अपारशक्ती खुरानाची जोरदार चर्चा आहे. आयुष्माननं लागोपाठ सुपरहिट चित्रपट देऊन बॉलिवूडमध्ये आपलं स्थान निर्माण केलंय. 'अंधाधून'साठी त्याला राष्ट्रीय पुरस्कारदेखील मिळाला. तर दुसरीकडे आयुष्मानचा भाऊ अपारशक्तीनंही आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. मात्र आता अपारशक्तीलादेखील मुख्य भूमिका मिळायला हवी अशी इच्छा आयुष्माननं व्यक्त केली आहे. 

फोर्ब्समध्ये कंगनाच्या उत्पन्नाचे आकडे चुकीचे?, बहिणीनं मागितला पुरावा

अपारशक्ती हा आतापर्यंत सहाय्यक अभिनेत्याच्या भूमिकेत दिसला आहे. विनोदाच्या अफलातून टायमिंगसाठी प्रसिद्ध असलेला अपारशक्ती अनेकदा मुख्य अभिनेत्याच्या मित्राची भूमिका साकारताना दिसतो. 'स्त्री', 'लूकाछुपी', 'पती पत्नी और वो', 'दंगल', 'हॅपी फिर भाग जाएगी'सारख्या चित्रपटात त्यांनं विनोदी सहाय्यक व्यक्तीरेखा साकराल्या आहेत. विशेष म्हणजे त्याच्या अभिनयाचं लोकांनी खूपच कौतुक केलं.
गेल्या काही चित्रपटांत अपारशक्तीनं सर्वोत्तम काम केलं आहे त्यामुळे त्याला मुख्य अभिनेत्याच्या भूमिका मिळाल्या पाहिजे असं मत आयुष्माननं न्यूज १८ इंडियाशी बोलताना व्यक्त केलं. अपारशक्ती हा आयुष्मानचा लहान भाऊ आहे. 

प्रियांका-निकच्या लग्नातून उमेद भवन पॅलेसला मिळाले ३ महिन्यांचे उत्पन्न!

अपारशक्तीनं आतापर्यंत अनेक चित्रपटात सहाय्यक अभिनेत्याची भूमिका साकारली आहे, विशेष म्हणजे याकडे बघण्याचा सकारात्म   दृष्टीकोन त्यानं सांगितला. या क्षेत्रात प्रत्येकजण हिरो होण्यासाठी येतो सर्वांना मुख्य भूमिका करायची असते अशा वेळी कोणीतरी हिरोच्या मित्राची भूमिका करायला हवी ना, असं तो सहजपणे म्हणाला होता. कोणतंही काम लहान किंवा मोठं नसतं  हेही 
अपारशक्तीनं दाखवून दिलं.