पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'बाला' चित्रपटाची धमाकेदार कमाई; ५० कोटींचा आकडा पार

बाला चित्रपट

बॉलिवूडचा सुपरस्टार आयुष्मान खुराणाच्या 'बाला' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई केली आहे. बाला चित्रपटाची कमाई दिवसेंदिवस वाढत चालली आहे. या चित्रपटाने ५० कोटींचा आकडा पार केला आहे. पहिल्याच दिवशी चित्रपटाने १०.१५ कोटींची कमाई केली होती. शनिवारी १५.७३ कोटी, रविवारी १८.०७ कोटी तर सोमवारी या चित्रपटाने ८.२६ कोटींची कामाई केली आहे. चार दिवसांत या चित्रपटाने तब्बल ५२.२१ कोटींची कमाई केली आहे.

मुलींच्या विश्वात नेणाऱ्या बहुचर्चित 'गर्ल्स'चा ट्रेलर लाँच

आयुष्मान खुराणाच्या चित्रपटांचा ओपनिंग विकेंड रेकॉर्ड - 

२०१९ - ड्रीम गर्ल - ४४.५७ कोटी
२०१९ - बाला - ४३.९५ कोटी
२०१८ - बधाई हो - ४५. ७० कोटी
२०१८ - अंधाधुन - १५ कोटी
२०१७ - बरेली की बरफी - ११.२५ कोटी
२०१९ - अर्टिकल १५ - २०.०४ कोटी

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

#Bala ki tasveer aapne banaayi. #Bala ki taqdeer aapne banaayi. 🙏🏻 #gratitude

A post shared by Ayushmann Khurrana (@ayushmannk) on

अयुष्मान खुराणा, भूमी पेडणेकर आणि यामी गौतम यांच्या बाला चित्रपटाला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळत आहे. बाला चित्रपटाला मिळणाऱ्या यशाबाबत आयुष्मान खुराणाने चाहत्यांचे आभार मानले आहे. त्याने इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे. 'बालाचे चित्र तुम्ही बनवले, बालाचे भविष्य सुध्दा तुम्ही तयार केले.', असे म्हणत आयुष्मानने सर्वांचे आभार मानले आहे. 

'लाल सिंग चड्ढा'मधला आमिरचा लूक व्हायरल