पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बाळाच्या नावासह अर्जुन रामपालने इन्स्टावर गोंडस फोटो केला शेअर

अर्जुन रामपाल

बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपालने बाळाचे नामकरण केले आहे. त्याने इन्स्टाग्रामवर एक गोंडस फोटो शेअर करत बाळाचे नाव काय ठेवले हे चाहत्यांना सांगितले आहे. अर्जुनने आपल्या बाळाचे नाव 'अरिक रामपाल' असे ठेवले आहे. अर्जुनने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोमध्ये बाळाचे चिमुकले हात त्याच्या हातात घेतल्याचे दिसत आहे.

बिग बॉस मराठी सिझन २ - माधव देवचके घराबाहेर

अर्जुनने त्याच्या इन्स्टाग्रामवर अरिकसोबत शेअर केलेल्या फोटोला एक सुंदर कॅप्शनही दिले आहे. 'अश्रू, आनंद, आभार आणि प्रकाशापासून तयार झालेली किंमती गोष्ट. आमच्या आयुष्यात इंद्रधनुष्याचे सर्व रंग आले आहेत. आम्हाला खूप नशिबवान असल्यासारखे वाटत आहे. ज्युनिअर रामपालचे आमच्या आयुष्यात खूप स्वागत आहे. प्रेम आणि आशिर्वादासाठी तुम्हा सगळ्याचे आभार. अरिक रामपालला हॅलो बोला.'  

ढिंच्याक पूजा पुन्हा एकदा ट्रेंडमध्ये, ट्विटरवर मीम्सचा पूर!

अर्जुन रामपाल १८ जुलै रोजी तिसऱ्यांदा बाप झाला. अर्जुनची प्रेयसी गॅब्रिएलाने एका गोंडस बाळाला जन्म दिला. मुंबईतल्या हिंदुजा हॉस्पिटलमध्ये तिने मुलाला जन्म दिला. मुलाच्या जन्मामुळे अर्जुन आणि गॅब्रिएला खूप आनंदी झाले आहेत. बाळाचा जन्म झाल्यानंतर अर्जुनने इन्स्टाग्रामच्या माध्यमातून चाहत्यांना माहिती दिली होती. आता देखील बाळाचे नामकरण केल्यानंतर त्याने इन्स्टाग्रामच्या माध्यमातून चाहत्यांना माहिती दिली आहे. दरम्यान, अर्जुनने माजी मिस इंडिया मेहर जेसियासोबत आधी लग्न केले होते. तिच्यापासून त्याला दोन मुली आहेत. त्याची नाव माहिका आणि मायरा आहेत. मागच्यावर्षी मेहर आणि अर्जुन वेगळे झाले. 

थिएटरमध्ये मोबाईल ड्रामा! 'आणि.. सुबोध भावे संतापला..'