पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कलाकार आणि तंत्रज्ञांना मिळणार 'म्हाडा'ची घरे

म्हाडा

चित्रपट आणि मालिकांमध्ये काम करणाऱ्या कलाकार आणि तंत्रज्ञांना आता म्हाडामार्फत स्वस्तात घरं उपलब्धं होणार आहेत. शिवसेना चित्रपट सेनेचे अध्यक्ष आणि शिवसेना सचिव आदेश बांदेकर यांनी म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांच्यासोबत बैठक घेतली. या बैठकीत कलाकार आणि तंत्रज्ञही उपस्थित होते. 

महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांत रहाणाऱ्या कलाकारांना त्यांच्या जिल्हा विभागातच म्हाडाची घरं उपलब्ध करण्यात येतील तर मुंबई एमएमआर रिजनमध्ये काम करणाऱ्या कलाकार आणि तंत्रज्ञांना विरारमध्ये म्हाडाची घरं उपलब्ध करण्यात येतील असं म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी सांगितलं. या योजनेमुळे बँकस्टेज कलाकार आणि तंत्रज्ञांना मोठा दिलासा मिळणार असल्याचं शिवसेना चित्रपट सेनेचे अध्यक्ष आणि शिवसेना सचिव आदेश बांदेकर यांनी सांगितलं.

बैठकीला सरचिटणीस संग्राम शिर्के, सुशांत शेलार, दिगंबर नाईक, नितीन घाग, विद्या खटावकर, राणी गुणाजी, कलाकार आणि म्हाडाचे अधिकारी हजर होते. शिवसेना पक्षप्रमुख ऊद्घव ठाकरे आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे याच्या आदेशानुसार सिनेमा आणि टिव्ही मालिका क्षेत्रात काम करणारे कलाकार आणि तंत्रज्ञांना म्हाडामार्फत स्वस्तात घरं उपलब्ध होणार आहेत.