पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मालिकेतील कोणताही भाग वगळला जाणार नाही: अमोल कोल्हे

अमोल कोल्हे

झी मराठी वाहिनीवरील 'स्वराज्य रक्षक संभाजी महाराज' या मालिकेतील संभाजीराजेंना अटकेनंतरचा भाग दाखवू नये अशी मागणी शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांनी केली होती. या मागणीला संभाजी महाराजांची भूमिका साकारणारे अभिनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी संमती दाखवल्याचा असल्याचा दावा अर्जुन खोतकर यांनी केला होता. मात्र मालिकेतील कोणताही भाग वगळ्याचे आश्वासन मी त्यांना दिले नसल्याचे अमोल कोल्हे यांनी सांगितले. तर, 'मी कोणतेही आश्वासन दिलेले नाही. शुटिंगमधील कोणताही भाग वगळला जाणार नाही, असे अमोल कोल्हे यांनी सांगितले आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

स्वराज्यरक्षक संभाजी मालिका २.५ वर्षे सुरू असताना जगदंब क्रिएशन्स आणि झी मराठी वाहिनीने जबाबदारीने आणि नैतिक कर्तव्यभावनेने ही मालिका केली आहे.. माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांच्या भावनेविषयी आदर आहे परंतु मुळातच काळजी घेतली असल्यामुळे कुणाच्या सांगण्यावरून काही बदल करण्याची आवश्यकता आहे असे मला वाटत नाही. मालिकेचे चित्रीकरण पूर्ण झाले असून काय दाखवायचे, काय वगळायचे हा निर्णय सर्वस्वी झी मराठी वाहिनीचा असेल! कृपया चुकीची बातमी दिली जाऊ नये ही विनंती .

A post shared by Dr. Amol Kolhe (@amolrkolhe) on

'भूत' आणि 'शुभ मंगल ज्यादा सावधान' चित्रपट तामिळ रॉकर्सवर लीक

अमोल कोल्हे यांनी इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये त्यांनी असे म्हटले आहे की, 'स्वराज्यरक्षक संभाजी मालिका अडीच वर्षांपासून सुरू असताना जगदंब क्रिएशन्स आणि झी मराठी वाहिनीने जबाबदारीने आणि नैतिक कर्तव्यभावनेने ही मालिका केली आहे. माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांच्या भावनेविषयी आदर आहे परंतू मुळातच काळजी घेतली असल्यामुळे कुणाच्या सांगण्यावरून काही बदल करण्याची आवश्यकता आहे असे मला वाटत नाही. मालिकेचे चित्रीकरण पूर्ण झाले असून काय दाखवायचे, काय वगळायचे हा निर्णय सर्वस्वी झी मराठी वाहिनीचा असेल.' असे सांगत याबाबत कोणतेही चूकीची माहिती दिली जाऊ नये अशी विनंती त्यांनी केली आहे. 

आयुष्मानच्या 'शुभ मंगल ज्यादा सावधान'वर डोनाल्ड ट्रम्प म्हणाले...