पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अमिताभ बच्चन यांना दादासाहेब फाळके पुरस्कार

अमिताभ बच्चन

शतकातील महानायक अमिताभ बच्चन यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी याची घोषणा केली.

त्यांनी महान अभिनेते अमिताभ बच्चन ज्यांनी दोन पिढ्यांचे मनोरंजन आणि प्रेरित केले. त्यांना सर्वसंमतीने या पुरस्कारासाठी निवडण्यात आले आहे. संपूर्ण देश आणि आंतरराष्ट्रीय समुदाय खूश आहे. त्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा, असे टि्वट प्रकाश जावडेकर यांनी केले आहे.  

हे वृत्त समोर येताच निर्माता करण जोहर यांनीही बिग बींना शुभेच्छा दिल्या. भारतीय सिनेमातील सर्वांत प्रेरणादायक लिजंड. ते रॉकस्टार आहेत. मी अमिताभ बच्चन यांच्या युगातील आहे, याचा मला अभिमान आहे, असे त्यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटले. 

अनिल कपूर यांनीही या लिजंडशिवाय भारतीय सिनेमा नाही असा उल्लेख केला आहे.  

दरम्यान, देशातील महान निर्माता, दिग्दर्शक दादासाहेब फाळके यांच्या सन्मानार्थ भारत सरकारने १९६९ मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार देण्यास सुरुवात केली होती. हा भारतीय सिनेमातील सर्वोच्च प्रतिष्ठित पुरस्कार आहे. सर्वांत प्रथम हा पुरस्कार देविका राणी चौधरी यांना देण्यात आला होता. १९७१ मध्ये भारतीय डाक विभागाने दादासाहेब फाळके यांच्या सन्मानार्थ एक डाक तिकीट जारी केले आहे. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Actor Amitabh Bachchan has been selected for the Dada Sahab Phalke award declared by union minister prakash javadekar