पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

घाईत उरकला विवाह, लग्नाच्या वाढदिवशी बच्चन यांनी जागवली आठवण

अमिताभ बच्चन

बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्या  लग्नाचा आज ४६ वा वाढदिवस. ४६ वर्षांच्या सहजीवनात  अनेक वादळं आली पण या जोडीनं सगळ्या वादळांना तोंड देत ती परतवून लावली. या  ४६ वर्षांत आयुष्यात आलेल्या अनेक संकटांना ही जोडी पुरून उरली. लग्नाच्या वाढदिवशी बच्चन यांनी पोस्ट लिहित त्यांच्या लग्नातील एक किस्सा सांगितला. अत्यंत घाईघाईत उरकलेल्या या लग्नाची गोष्ट त्यांनी यात लिहिली आहे.

'जया, मी, आणि आमच्या मित्रपरिवाराला लंडनमध्ये सुट्ट्या व्यतीत करण्यासाठी जायचं होतं. मात्र माझे  वडिल हरिवंश राय बच्चन यांनी  मला जाण्याची परवानगी नाकारली. त्यावेळी मी आणि जया एकमेकांना डेट करत होतो. लंडनला जायचं असेन तर आधी लग्न  करा अशी अट त्यांनी आमच्यापुढे  ठेवली  होती. लग्न झाल्याशिवाय वडील आम्हाला लंडनला पाठवायला तयार नव्हते. 

जंजीर चित्रपट हिट झाला तर आपण सर्व लंडनला जाऊ असं वचन मी मित्रपरिवाराला दिलं होतं. आम्ही मित्रपरिवार लंडनला जात असल्याचं त्यांना माहिती होतं. मात्र त्यात जया असल्यानं त्यांनी परवानगी नाकारली. तुम्ही दोघंही लग्न करा आणि मगच  लंडनला जा अशी अट त्यांनी समोर ठेवली. लंडनला  तर जायचंच होतं. तेव्हा दुसऱ्याच दिवशी आम्ही अत्यंत साधेपणानं घाईघाईत  लग्न केलं आणि रात्री लंडनसाठी रवाना झालो अशी आठवण बच्चन यांनी जागवली.