बॉलिवूड सुपरस्टार अक्षय कुमार, सारा अली खान आणि धनुषचा चित्रपट 'अतरंगी रे' चा टीझर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून चाहत्यांना त्याची खूप उत्सुकता लागली आहे. त्यामुळे या चित्रपटाचे दिग्दर्शक आनंद एल राय यांनी त्यांची उत्सुकता आणखी वाढवत 'अतरंगी रे' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित केला आहे. हा चित्रपट खूप संगीतमय आणि रंगीबेरंगी असणार आहे याची कल्पना टीझर पाहून येतेय.
Saat rang ishq ke...aathvaan Atrangi Re ♥️
— AANAND L RAI (@aanandlrai) January 30, 2020
Presenting #AtrangiRe
An @arrahman musical.
Releasing on Valentine's 2021
Written by: #HimanshuSharma#SaraAliKhan, @dhanushkraja, @akshaykumar, @TSeries, @cypplOfficial, #CapeOfGoodFilms, @itsBhushanKumar
https://t.co/DRsIwRMIat
रणवीरच्या 'जयेशभाई जोरदार'मध्ये ही अभिनेत्री आईच्या भूमिकेत
दिग्दर्शक आनंद एल राय यांनी ट्विटरवर या चित्रपटाच्या टीझरचा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करत त्यांनी असे लिहिले आहे की, 'सात रंग इश्क के, आठवा अतरंगी रे'. आपल्यासमोर सादर करीत आहे अतरंगी रे ए. आर. रहमान यांचा संगीतमय चित्रपट. जो पुढच्या वर्षी २०२१ मध्ये व्हॅलेंटाईनच्या निमित्ताने प्रदर्शित होणार आहे.' टीझरचा व्हिडिओ शेअर करत त्यांनी तो टी-सिरीजसह हिमांशू शर्मा, सारा अली खान, धनुष आणि अक्षय कुमार यांनाही टॅग केले आहे.
गणेश आचार्य नवोदितांचा गैरफायदा घेतो, तनुश्रीचा आरोप
अभिनेता शाहरुख खान आणि अनुष्का शर्मा यांचा 'झिरो' चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर दिग्दर्शक आनंद एल राय यांचा हा पहिला चित्रपट आहे ज्याची निर्मिती सुध्दा त्यांनी केली आहे. तर टॉलिवूड अभिनेता धनुषचा हा तिसरा हिंदी चित्रपट आहे. या चित्रपटात तो सारा अली खानसोबत रोमांस करताना दिसणार आहे. १ मार्च २०२० पासून या चित्रपटाच्या चित्रिकरणाला सुरुवात होणार आहे.