पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

जामिया मिलिया आंदोलन : अक्षय कुमारचा ट्विटरवर खुलासा

अक्षय कुमार

दिल्लीतील जामिया मिलिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी केलेले आंदोलन, त्यानंतर उसळलेला हिंसाचार आणि पोलिसांची कारवाई यावर देशभरातून प्रतिक्रिया उमटत आहे. अशातच अभिनेता अक्षय कुमारनं ट्विटरवर खुलासा जारी केला आहे. या आंदोलनातील एक व्हिडिओ अक्षयनं सोशल मीडियावर लाइक केला होता. मात्र हा व्हिडिओ अनावधानानं लाइक झाला असून आपण अशा प्रकारच्या गोष्टीचं समर्थन करत नाही असं अक्षयनं स्पष्ट केलं आहे. 

अक्षयनं पत्नीला भेट दिले कांद्याचे झुमके

Regarding the ‘like’ on the tweet of Jamia Milia students, it was by mistake. I was scrolling and accidentally it must have been pressed and when I realised I immediately unliked it as In no way do I support such acts.

जामिया मिलिया विद्यार्थ्यांच्या आंदोलनासंदर्भातील एक व्हिडिओ माझ्याकडून अनावधानानं लाइक झाला. मी स्क्रोल करत असताना चुकून तो व्हिडिओ लाइक झाला. ही बाब माझ्या लक्षात येताच मी तो व्हिडिओ अनलाइकही केला . मी अशा कोणत्याही कृतीचं समर्थन करत नाही असं अक्षयनं या ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

जानेवारीत रंगणार दीपिका विरुद्ध अजय आणि रजनीकांत यांचं महायुद्ध