पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सारा, अभिनंदन वर्धमान ठरल्या पाकमध्ये सर्वाधिक सर्च केलेल्या भारतीय व्यक्ती

सारा अली खान

'केदारनाथ' चित्रपटातून गेल्यावर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेली सारा  अली खान, विंग कमांडर अभिनंदन वर्धमान या पाकिस्तानमध्ये इंटरनेटवर सर्वाधिक सर्च केलेल्या भारतीय व्यक्ती ठरल्या आहे. गुगलनं पाकिस्तानमधील इंटरनेटवर सर्वाधिक सर्च केलेल्या दहा व्यक्तींची यादी नुकतीच जाहीर केली.  त्यात सारा अली खान, अभिनंदन वर्धमान यांचा समावेश होता. या यादीत दोघंही अनुक्रमे सहाव्या आणि नवव्या स्थानी आहेत. 

Happy Birthday : विनोदाची उत्तम जाण अन् टायमिंगवर कमालीची हुकूमत

विशेष म्हणजे सध्या सुरु असलेला बिग बॉसचा वादग्रस्त तेरावा सीझन हा सर्च यादीत  दुसऱ्या क्रमांकावर आहे.  तर लहान मुलांचा  कार्यक्रम 'मोटू पटलू' हा आठव्या स्थानी आहे. या यादीत यंदा प्रदर्शित झालेल्या दोन भारतीय चित्रपटांचाही समावेश आहे. 

सनी- सोनालीचा 'जय मम्मी दी' पुढील वर्षी येतोय प्रेक्षकांच्या भेटीला

रणवीर- आलियाचा 'गली बॉय' आणि शाहिद कपूर- किआरा अडवाणीचा 'कबीर सिंग' या चित्रपटानं  यादीत अनुक्रमे पाचवे आणि दहावे स्थान मिळवले आहे.  'गली बॉय' आणि 'कबीर सिंग' हे दोन्ही चित्रपट २०१९ मधले सुपरहिट चित्रपट ठरले होते.