पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'आरॉन'च्या दिग्दर्शकाचा नवा चित्रपट ‘कागर’ फेम शुभंकर प्रमुख भूमिकेत

'आरॉन'च्या दिग्दर्शकाचा नवा चित्रपट

 कुठल्याही दिग्दर्शकाला आपल्या चित्रपटाची निवड आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी व्हावी असं जरूर वाटत असतं. सर्वांचीच ही इच्छा पूर्ण होत नसली तरी ‘आरॉन’ या चित्रपटाच्या निमित्ताने चित्रपटाचे दिग्दर्शक ओमकार शेट्टी यांची ही इच्छा पूर्ण झाली. जागतिक चित्रपटक्षेत्रात सर्वात मानाचा समजल्या जाणाऱ्या  ‘कान’ (Cannes) आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ’आरॉन’ महाराष्ट्र शासनाकडून पाठवण्यात आला होता.  फक्त “कान” नाही तर जगातील अनेक चित्रपट महोत्सव आरॉन ने गाजवले.

या मराठी चित्रपटात पाहायला मिळणार तब्बल १४० कलाकारांची फौज

 ‘आरॉन’ नंतर पुढे काय असा प्रश्न प्रेक्षकांना पडलेला असताना लेखक-दिग्दर्शक ओमकार शेट्टी एक अनोखी कथा घेऊन नवीन चित्रपट तयार करत आहे. या चित्रपटात ‘कागर’ फेम अभिनेता शुभंकर तावडे  मुख्य भूमिकेत दिसणार आहे.  मात्र तूर्त चित्रपटाविषयी पूर्णपणे गुप्तता बाळगण्याचं 'आरॉन'च्या टीमनं ठरवलं आहे.  या चित्रपटात शुभंकरसोबत  कोणती अभिनेत्री प्रमुख भूमिकेत दिसेल याची सगळ्यांना उत्सुकता आहे. 

मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीविरोधात जामीनपात्र अटक वॉरंट जारी