पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आरेतील झाडांच्या कत्तलीवर बॉलिवूडकरांचा तीव्र निषेध

आरेमधील झाडांच्या कत्तलीला सेलिब्रिटींचा विरोध

मुंबईतील आरेत सुरू असणाऱ्या झाडांच्या कत्तलीवर बॉलिवूडकरांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे.  मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालानंतर शुक्रवारी रात्री आरे कॉलनीतील झाडे तोडण्यास सुरुवात करण्यात आली. शेकडो झाडांची रातोरात कत्तल करण्यात आली. पण याचे गंभीर पडसाद या संपूर्ण परिसरात उमटले. अनेक पर्यावरणप्रेमी आंदोलकांनी या कामाला तीव्र विरोध केला आणि घटनास्थळी आंदोलन केले. आरेत सुरू असणाऱ्या  झा़डांच्या कत्तलीविरोधात बॉलिवूडनंही आवाज उठवला आहे. 

LIVE : आरे कॉलनीमध्ये जमावबंदीचे आदेश, २९ जण अटकेत

रातोरात झाडांची कत्तल करणं हा घृणास्पद प्रकार आहे असं करून आपण खूप मोठी चूक केलीय हे करणाऱ्याला  देखील ठावूक आहे अशा शब्दात फरहान अख्तरनं नाराजी व्यक्त केली आहे. 

युएनची सद्भवाना दूत असलेली आणि पर्यावरणप्रेमी अभिनेत्री दिया मिर्झानंही या कत्तलीविरोधात नाराजी व्यक्त केली आहे. '४०० वृक्ष रातोरात तोडण्यात आले. ही कत्तल रोखण्यासाठी सारे  नागरिक एकत्र आले. पर्यावरणाप्रती असलेल्या प्रेमामुळे सारेजण एकत्र आलेत ही एकी तुम्हाला दिसत नाही का? पर्यावरणाचा ऱ्हास होतोय यावर ठोस उपाय करायलाच हवा', अशी कळकळही तिनं व्यक्त केली आहे. 

'हे चुकीचं आहे, झाडांची कत्तल होण्यापासून आपण रोखलं पाहिजे, मुंबईकरांनी आरे वाचवण्यासाठी एकत्र आलं पाहिजे', असं आवाहन अभिनेत्री श्रद्ध कपूरनं केलं आहे. 

भाजपचे घाटकोपर पूर्वतील उमेदवार पराग शहा ५०० कोटींचे धनी

अभिनेत्री स्वरा भास्कर, उर्मिला मातोंडकर, रिचा चड्ढा यांनी  आरेतील वृक्ष कत्तलीविरोधात आवाज उठवला आहे. मेट्रो ३ च्या कारशेडसाठी आरे कॉलनीतील २६४६ झाडे तोडण्यात येणार आहेत. त्याला पर्यावरणप्रेमींचा विरोध आहे. राजकीय पक्षांनीही वृक्षतोडीला विरोध केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी, केवळ सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी स्थगिती दिल्यास अडचण होऊ नये म्हणून एका रात्रीत झाडे तोडण्यात आल्याचे म्हटले आहे. युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनीही रात्रीच्या अंधारात झाडे तोडण्याचे कृत्य भ्याडपणाचे असल्याचे म्हटले आहे. या कृतीचा त्यांनी ट्विटच्या माध्यमातून तीव्र निषेध केला आहे.