पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

माझी मदत न घेता करिअर घडवत आहेत, आमिरला वाटतोय मुलांचा अभिमान

आमिर खान - इरा खान

 बॉलिवूडमधल्या अनेक बड्या कलाकारांच्या मुलांनी आपल्या आई वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे.  अनेक स्टारकिड्नं अभिनयात आपलं नशीब आजमावलं आहे. बॉलिवूडचा सुपरस्टार आणि मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानची  मुलंही बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार अशा चर्चा होत्या. मात्र आमीरच्या मुलीनं करिअरसाठी चित्रपटाऐवजी  नाट्यसृष्टीची निवड केली. 

जानेवारीत रंगणार दीपिका विरुद्ध अजय आणि रजनीकांत यांचं महायुद्ध

आमीरची मुलगी इरा खान हिनं नाट्य दिग्दर्शक म्हणून रंगभूमीवर पाऊल ठेवलं आहे. तर मुलगा जुनैदनही  रंगभूमीवरून अभिनयाचा श्रीगणेशा केला आहे. दोन्ही मुलांनी आपल्या हिमतीवर करिअर घडवायला सुरूवात केली आहे. महत्त्वाचं म्हणजे त्या दोघांनीही माझी मदत घेतली नाही, ते स्वत: यातून मार्ग काढत आहेत आणि वडिल म्हणून मला माझ्या दोन्ही मुलांचा अभिमान आहे असं अभिनेता अमीर खान म्हणाला.

स्मृतीदिन विशेष : मराठी सिने-नाट्यसृष्टीतील 'विनोदाचा बादशहा'

इराला नाट्य दिग्दर्शनात रस होता. तिनं मला याची पूर्वकल्पना दिली होती. मात्र तिनं माझी मदत कधीही मागितली नाही, जुनैदनही स्वत:  रंगभूमीवर अभिनयास सुरुवात केली असंही आमीर म्हणाला. 'माझी मुलं त्या योग्यतेची असतील आणि जर त्याचं काम तितक्याच तोडीच असेल तर भविष्यात मी नक्कीच त्यांना मदत करेल, असंही आमीर म्हणाला.