पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

..तर आमिरऐवजी 'मोगुल'मध्ये कपिल शर्मानं साकारली असती गुलशन कुमार यांची भूमिका

कपिल शर्मा

टी- सीरिजचे सर्वेसर्वा गुलशन कुमार यांच्या जीवनावर आधारित 'मोगुल' चित्रपट लवकरच येणार आहे. या चित्रपटात आमिर खान मुख्य भूमिकेत आहे. तो गुलशन कुमार यांची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात अक्षय कुमार मुख्य भूमिकेत दिसणार होता मात्र हे गणित जुळून आलं नाही. आश्चर्य म्हणजे मोगुल' मध्ये मुख्य भूमिकेसाठी आमिरनं सुरुवातीला तीन नावांचा विचार केला होता. त्यात अक्षय कुमारसोबत वरुण धवन आणि कॉमेडियन कपिल शर्माच्या नावाचाही समावेश होता. 

आमिर खान या चित्रपटाची निर्मिती करत आहे. गुलशन कुमार यांचे चिंरवजीव भूषण यांनी मुख्य भूमिकेसाठी आधी अक्षयला विचारले होते. खुद्द  अक्षयनं गुलशन कुमार यांची भूमिका साकारावी अशी आमिरचीही इच्छा होती. यासाठी आमिरनं अक्षयची भेटही घेतली होती. मात्र काही कारणानं अक्षयचा या चित्रपटात काम करण्याचा योग जुळून आला नाही. 

कॅन्सरवर मात देऊन ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर परतले भारतात

अक्षय कुमारनंतर आमिरनं वरुण धवनच्या नावाचाही विचार केला. मात्र वरुण इतर चित्रपटात व्यग्र होता. वरुणकडे चित्रपटासाठी तारखा नव्हत्या. वरुण व्यतिरिक्त गुलशन कुमार यांची भूमिका कॉमेडियन कपिल शर्मा उत्तम साकारू शकतो अशी खात्री आमिरला होती. 
'कपिलनं नक्कीच गुलशन यांची भूमिका उत्तम केली असती. तो या भूमिकेत शोभून दिसला असता. पण ही गोष्ट देखील जुळून आली नाही.' असं आमिर म्हणाला. अखेर आमिरनं स्वत: या चित्रपटाला होकार दिला. गेल्यावर्षी या चित्रपटाची घोषणा झाली होती. मात्र चित्रपटाचे दिग्दर्शक शेखर कपूर यांच्यावर मी टु मोहिमेअंतर्गत अनेक आरोप झाले. या आरोपांमुळे आमिरनं या चित्रपटास नकार दिला. 

The Sky Is Pink : मुलीच्या नजरेतून आई- वडिलांच्या 'प्रेमाची गोष्ट'

मात्र जवळपास १० महिन्यांनंतर आमिरनं आपला निर्णय पुन्हा एकदा बदलला. त्यामळे 'मोगुल' मध्ये आमिरच महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.