पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

.. म्हणून श्रमदान करणाऱ्या आमिर खानवर चिडले नेटकरी

आमिर खान महाश्रमदान

'पाणी फाऊंडेशन'तर्फे आमिर खान एक चांगला उपक्रम महाराष्ट्रात राबवत आहे. 'महाराष्ट्र दिना'चं औचित्य साधून आमिर आणि त्याची पत्नी किरण महाश्रमदानात सहभागी झाले. आपल्या कामाचा व्हिडिओ आमिरनं सोशल मीडियावर शेअर केला. 'कामगार दिन' आणि 'महाराष्ट्र दिना'च्या शुभेच्छा देत आमिरनं तमाम चाहत्यांना श्रमदानात आणि पाणी फाऊंडेशनच्या उपक्रमात सहभागी होण्याचं आवाहनही केलं. मात्र चांगला उपक्रम राबवत असलेला आमिर एका चुकीमुळे सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या रोषाचा बळी ठरला.

वाचा : मला काळजी आहे करपलेल्या शेताची, सईचं महाश्रमदान

आमिर  कुदळ घेऊन माती खणत होता त्याच्यासोबत पत्नी किरण राव देखील होती. दुसऱ्या व्हिडिओमध्ये चार पाच वर्षांची चिमुकली आमिरला श्रमदानात मदत करताना दिसत आहे. हा बालमजुरीचा प्रकार आहे असं सांगत अनेकांनी आमिर खानवर टीकेची  तोफ डागली आहे. कामगार दिनाच्या आमिर शुभेच्छा देतो मात्र दुसरीकडे छोट्या मुलीकडून काम करून घेतो असा आरोपही काही नेटकऱ्यांनी आमिरवर केला आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Happy Mahashramdaan! #mejalmitra #paanifoundation @paanifoundation

A post shared by Aamir Khan (@_aamirkhan) on

पाणी अडवा पाणी जिरवा ही संकल्पना वापरून लोकांप्रती जनजागृती करणाऱ्या आमिरवर लवकरच 'रुबरू रोशनी' हा चित्रपटदेखील येणार आहे. या चित्रपटाची निर्मिती पाणी फाऊंडेशन अंतर्गतच होणार आहे. या चित्रपटाद्वारे आमिर चाहत्यांना पाणी बचतीसाठी  मार्गदर्शन करताना दिसणार आहे.