पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

देशातल्या १०० ठिकाणी होणार आमिरच्या चित्रपटाचं चित्रीकरण, हिंदीत नवा विक्रम

आमिर खान

आमिर खान आपल्या आगामी चित्रपट 'लाल सिंह चड्ढा'साठी खूपच मेहनत घेत आहे. या चित्रपटासाठी आमिरनं २० किलो वजनही घटवलं आहे. येत्या ऑक्टोबरपासून चित्रीकरणाला सुरूवात होणार आहे. मात्र बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आमिरनं यावेळी एक वेगळा प्रयोग करण्याचं ठरवलं आहे.

उजळ वर्णामुळे अभिनेत्रीला दिला चित्रपटासाठी नकार

आमिर या चित्रपटासाठी देशातल्या १०० ठिकाणी चित्रीकरण करणार आहे. सेट तयार करून त्यात चित्रीकरण करण्यावर आमिरचा फारसा विश्वास नाही. जास्तीत जास्त खरेपणा येईल अशा गोष्टींचा स्वीकार करण्यावर आमिरचा भर आहे. म्हणूनच या चित्रपटाचं चित्रीकरण गुजरात, महाराष्ट्र, कोलकाता, हैदराबाद, बंगळुरू अशा विविध ठिकाणी होणार आहे. 

हॉलिवूड चित्रपट फॉरेस्ट गम्पचा अधिकृत रिमेक असलेल्या या चित्रपटात नायकाचा प्रवास दाखवण्यात आला आहे. या चित्रपटाच्या निमित्तानं आमिर भारतभर चित्रीकरण करणार आहे, हिंदी चित्रपटाच्या इतिहासात पहिल्यांदाच देशातल्या १०० ठिकाणी चित्रीकरण करण्यात येणार आहे, हा एक विक्रमच म्हणावा लागेल अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. 

IIFA Awards 2019 : या कलाकारांनी उठवली आयफावर मोहोर

'लाल सिंह चड्ढा'ची कथा मराठी अभिनेता अतुल कुलकर्णी यानं लिहिली आहे तर अद्वैत चंदन दिग्दर्शन करणार आहे.