पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आतापर्यंत न पाहिलेला 'लाल सिंग चड्ढा' मधला आमिरचा लूक व्हायरल

लाल सिंग चड्ढा

आमिर खान बॉलिवूडचा 'मिस्टर परफेक्शनिस्ट' म्हणून ओळखला  जातो. आतापर्यंत '३ इडियट्स', 'पिके', 'ठग्ज ऑफ हिंदोस्थान', 'दंगल'सारख्या चित्रपटात आमिरला  प्रेक्षकांनी वेगवेगळ्या भूमिकेत किंवा विविध रुपात पाहिलं  असेल. प्रत्येक चित्रपटात आमिर मागील चित्रपटांपेक्षाही वेगळा ठरला. आता तो  लवकरच 'लाल सिंग चड्ढा' या चित्रपटात दिसणार आहे.  

'अंधाधून'मध्ये छान काम केलंस, आयुष्मानचं लतादीदींकडून कौतुक 

या चित्रपटासाठी आमिरनं दाढीही वाढली आहे. तो शीख व्यक्तीरेखा साकारत आहे. या वेषातले आमिरचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरलही झाले होते. मात्र आता त्याच चित्रपटातील आमिरचा नवा लूक व्हायरल होत आहे. यात आमिरनं लष्कराचा वेश परिधान केलेला दिसत आहे. या चित्रपटातील आधीच्या लूकपेक्षाही  आमिरचा हा लूक खूपच वेगळा आहे.

तापसीच्या 'थप्पड'ची बॉक्स ऑफिसवर संथ कमाई

'द फॉरेस्ट गम्प' या गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा हा रिमेक आहे. देशांच्या विविध शहरात या चित्रपटाचं चित्रीकरण सुरु आहे. या चित्रपटाची कथा मराठी अभिनेता अतुल कुलकर्णीनं लिहिली आहे.  'लाल सिंग चड्ढा' साठी आमिरनं वजनही कमी केले आहे. देशातल्या सर्वाधिक शहरात चित्रीत होणार  हा कदाचित बॉलिवूडमधला पहिलाच चित्रपट ठरण्याची शक्यता आहे. आमिरसोबत या चित्रपटात करिना कपूरही प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. 

'प्रत्येक चित्रपटात तुझ्यासोबत रोमान्स करण्याची संधी मिळाली असती तर'