पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'सांड की आँख' चित्रपटातून आमिरच्या बहिणीचं बॉलिवूडमध्ये पदार्पण

निखत खान

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानची बहिण निखत खान 'सांड की आँख' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. निखतनं निर्माती म्हणून स्वत:ची वेगळी ओळख तयार केली आहे. आता ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे.  पिंकविलाच्या माहितीनुसार 'सांड की आँख' चित्रपटात निखत ही राणीच्या भूमिकेत दिसू शकते. तिची भूमिकादेखील मोठी असणार आहे.

उत्तर प्रदेशमधल्या जोहरी गावात राहणाऱ्या ८६ वर्षीय चंद्रो तोमर आणि ८१ वर्षांची त्यांची नणंद प्रकाशी यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट असणार आहे. ‘रिव्हॉल्वर दादी’ म्हणून  ओळखल्या जाणाऱ्या  चंद्रो आणि प्रकाशी वयाच्या ५० व्या वर्षी रायफल चालवायला शिकल्या.  विविध स्पर्धांमध्ये या दोघींनी मिळून ७००हून अधिक पदकं जिंकली आहेत. त्याची ही प्रेरणादायी कथा या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. भूमी पेडणेकर चंद्रो तर तापसी  पन्नू प्रकाशीच्या भूमिकेत दिसणार आहे. 

आमिर खाननं रुपेरी पड्यावर अभिनय क्षेत्रात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली  आहे. आता आमिरची बहिण निखतही अभिनय क्षेत्रात आपलं नशीब आजमावून पाहणार आहे. २५ ऑक्टोबरला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.