पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

तू अजूनही माझ्यासाठी लहानच, आमिरची लेकीसाठी भावनिक पोस्ट

आमिर- इरा खान

 'मिस्टर परफेक्शनिस्ट' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आमिरनं मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आमिरची मुलगी इरा  २१ वर्षांची आहे. तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा  देत आमिरनं एक भावनिक पोस्ट लिहिली आहे. हा फोटो इराच्या बालपणीचा आहे. 

'तू एवढ्या लवकर मोठी झाली यावर मला विश्वासच बसत नाहीये. तू माझ्यासाठी अजूनही ती ६ वर्षांची चिमुकलीच आहे' असं लिहित आमिरनं इराला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.  आमिरनं  मंगल पांडे चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान इरासोबत काढलेला फोटो शेअर केला आहे. इरा ही आमिरची पूर्वाश्रमीची पत्नी रिनाची मुलगी होय. रिनापासून विभक्त झाल्यानंतर आमिरनं किरण राव सोबत लग्न केलं. आमिरला लहान मुलगा आहे. 

काही महिन्यापूर्वी एका मुलाखतीत आमिरला मुलगी इराविषयी प्रश्न विचारण्यात आले होते. मुलगी इरा  बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार का? यासंबधी प्रश्न होता. मात्र तिला कशात करिअर घडवायचं आहे हे मला माहिती नाही. तिचा कल हा चित्रपट निर्मितीकडे अधिक असल्याचं आमिरनं  मुलाखतीत स्पष्ट केलं होते. 

आमिरचा मुलगा जुनेद खानही अभिनयाच्या क्षेत्रात पाऊल ठेवण्याचा विचार करत आहे. मात्र जुनेदनं स्वत:च्या मेहनतीवर बॉलिवूडमध्ये यावं असं आमिरनं स्पष्ट केलं. आमिर लवकरच 'फॉरेस्ट ग्रम्प' च्या हिंदी रिमेकमध्ये झळकणार आहे. 'लाल सिंग चड्ढा' असं चित्रपटाचं नाव असणार आहे.