पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आमीर खानने मागितली माफी, नेटिझन्सनी उडविली खिल्ली

आमीर खान

जैन पर्यूषण पर्वाच्या अखेरीस अभिनेता आमीर खान याच्याकडून दरवर्षी मागील वर्षभरात जाणते-अजाणतेपणी कोणाचे मन दुखावले गेले असल्यास माफी मागितली जाते. जैन धर्मामध्ये याला मिच्छामी दुक्कडम असे म्हणतात. आमीर खान दरवर्षी अशा स्वरुपाची पोस्ट सोशल मीडियात प्रसिद्ध करतो. पण यावेळी या पोस्टवरून काही जणांनी आमीर खानला चिमटे काढले आहेत.

'या' मुद्द्यावरुन लता मंगेशकर यांनी घेतली सरकारविरोधी भूमिका

आमीर खानने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, जर माझ्याकडून कोणीही जाणते-अजाणतेपणी दुखावले गेले असेल तर त्याबद्दल मी मान खाली घालून आणि हात जोडून माफी मागतो. कृपा करून मला माफ करा. हा संदेश आमीर खानने इन्स्टाग्राम आणि ट्विटरवरही शेअर केला आहे.

पण याच संदेशावरून काही नेटिझन्सनी त्याला चिमटे काढले आहेत. काही जणांनी त्याच्या या संदेशाला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केला. देशातील अनेक महत्त्वाच्या मुद्द्यावर आमीर खानने इतके दिवस चुप्पी का बाळगली होती, असा प्रश्न काही जणांनी उपस्थित केला. 

VIDEO : सगळ्यांसमोर सिद्धरामय्या यांनी सहायकाला कानशिलात लगावली

काही जणांनी याच विषयावरून आमीर खानला कोपरखळी मारली आहे. काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या आपल्या चित्रपटाबद्दल तर आमीर खान माफी मागत नसेल ना, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. आमीर खानचा काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेला ठग्ज ऑफ हिंदूस्थान हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला होता. अनेकांना हा चित्रपट आवडला नव्हता आणि त्यांनी आमीर खानवर त्यावेळी टीकाही केली होती.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Aamir Khan (@_aamirkhan) on

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Aamir Khan seeks forgiveness in annual Michhami Dukkadam post I forgive you for Thugs of Hindostan say fans