पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अतुल कुलकर्णी लिखित आमिरचा चित्रपट या तारखेला होणार प्रदर्शित

आमिर खान


अभिनेता अतुल कुलकर्णी  लिखीत आमिरचा चित्रपट २०२० मध्ये प्रदर्शित होत आहे. आमिरनं आपल्या ५४ व्या वाढदिवशी नव्या चित्रपटाची घोषणा केली होती. ऑस्कर विजेता 'फॉरेस्ट ग्रम्प' चित्रपटाचा हा  अधिकृत रिमेक असणार आहे. या चित्रपटाचं नाव 'लाल सिंग चढ्ढा' असून चित्रपटाची कथा अतुल कुलकर्णीनं लिहिली आहे.

आमिरनं वाढदिवशी चित्रपटाची घोषणा केली होती तेव्हापासून चाहते या चित्रपटासाठी उत्सुक होते. अखेर हा चित्रपट पुढीलवर्षी ख्रिस्मसच्या सुट्टीमध्ये प्रदर्शित होणार आहे. अद्वेत चंदन या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहे. ऑक्टोबर पासून चित्रीकरणाला सुरूवात होणार आहे.  तत्पुर्वी चित्रपटाच्या इतर तयारीला सुरूवात झाली आहे.

प्रत्येक चित्रपटासाठी स्वत:वर मेहनत घेणाऱ्या आमिरनं लाल सिंग चढ्ढासाठी वजन घटवलं आहे.  या चित्रपटासाठी मी बारीक दिसणं आवश्यक आहे. मला २० किलो वजन घटवायचं आहे त्यामुळे मी आता वजन घटवायला सुरूवात केली आहे अशी माहिती आमिरनं काही दिवसांपूर्वी दिली. 
'मी फॉरेस्ट ग्रम्प पाहिला होता. हा चित्रपट मला खूपच आवडला. त्यानंतर या चित्रपटाचा रिमेक करण्याचा मी निर्णय घेतला' असंही आमिर म्हणाला. आमिरचा २०१८ साली प्रदर्शित झालेला 'ठग्स ऑफ हिंदोस्थान' पडद्यावर जोरदार आदळला होता. त्यामुळे पुढील वर्षी प्रदर्शित होणाऱ्या 'लाल सिंग चढ्ढा' कडून प्रेक्षकांच्या खूपच अपेक्षा असणार आहेत.