पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आमिर खाननं वाढदिवशी जूहीला दिली होती आठवणीत राहण्याजोगी भेट

जूही चावला

बॉलिवूड अभिनेत्री जूही चावला ही  ५२ वर्षांची झाली. हिंदुस्थान टाइम्सशी साधलेल्या संवादात जूहीनं  वाढदिवसाच्या आठवणींना उजाळा दिला. विशेष म्हणजे आमिरनं दिलेल्या वाढदिवसाच्या भेटीचा तिनं आवर्जून  उल्लेख केला. 

लहान मुलाविरोधात अपशब्द वापरणाऱ्या स्वराचं स्पष्टीकरण

'कयामत से कयामत तक' या चित्रपटात जूही आणि आमिरनं एकत्र काम केलं. हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि जूही रातोरात स्टार झाली. आमिर आणि जूही ही त्यावेळची रुपेरी पडद्यावरची हिट जोडी होती. जूहीच्या एका वाढदिवशी आमिरही आला होता. 'मी तुझ्यासाठी भेटवस्तू आणली आहे असं आमिरनं मला सांगितलं. माझा आनंद गगनात मावेनासा झाला होता. त्यानं माझ्यासाठी काय आणलं हे जाणून घेण्यास मी कमालीची उत्सुक होती. त्यानं माझ्यासाठी एक छोटसं चॉकलेट आणलं होतं. मला हे पाहून हसू अनावर झालं. ' वाढदिवसाची खास आठवण सांगायची झाली की हा किस्सा मला नेहमी आठवतो, मात्र ती खूपच गोड आठवण होती असंही जूही म्हणाली. 

'कयामत से कयामत तक' नं रातोरात पालटलं जूहीचं नशीब

जूही ही गेल्या वर्षांपासून वाढदिवसादिवशी गरजू लोकांना आणि लहान मुलांना अन्नदान करते. माझ्या वाढदिवशी  २०० लहान मुलांना आणि गरजूंना मी अन्नदान करणार आहे, असं जूहीनं सांगितलं.  वाढदिवशी मला भेट पाठवण्यापेक्षा वृक्षारोपण करा अशी विनंतीही तिनं चाहत्यांना केली आहे.