पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी आमिर खानची २५ लाखांची मदत

आमिर खान

कोल्हापूर, सांगली पूरग्रस्तांसाठी देशभरातून मदतीचे हात पुढे येत आहेत. पुराचं पाणी ओसरलं आहे. आता पुराच्या पाण्यात वाहून गेलेले संसार उभं करण्याचं मोठं आव्हान पूरग्रस्तांपुढे आहे. सर्वसामान्य नागरिकांबरोबरच मराठी आणि बॉलिवूडच्या कलाकारांनीही पूरग्रस्तांना मदत केली आहे. मदतीसाठी आमिर खानही पुढे आला आहे.

कोल्हापूर, सांगली पूरग्रस्तांसाठी बिग बी करणार मदत

आमिरनं कोल्हापूर, सांगली पूरग्रस्तांसाठी २५ लाखांची मदत केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत ही माहिती दिली. आमिरनं मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी २५ लाखांची मदत केली आहे. तर ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांनी ११ लाखांची मदत केली आहे. 

 जेनेलिया आणि रितेश देशमुख यांनी देखील २५ लाखांची मदत पूरग्रस्तांसाठी केली आहे. बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारही पूरग्रस्तांसाठी पुढे आला आहे. 'कोल्हापूर आणि सांगलीमध्ये मुसळधार पावसामुळे मोठं नुकसान झालं आहे. तुम्ही सर्वांनी धीर धरा, असं मी आवाहन करतो. आपण लढून पुढे जायला  छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराजांकडून शिकलो आहोत. सरकार आणि कोल्हापूर आपत्ती निवारण तुकडी तुमची सर्वतोपरी मदत करण्यासाठी तत्पर आहेत. मला विश्वास आहे कोल्हापूर आणि सांगली पहिल्यासारखचं सुंदर होईन. मी तुमच्यासोबत नेहमीच आहे, असा भावनिक संदेश अक्षय कुमारनं कोल्हापूर आणि सांगलीतील पूरग्रस्तांना दिला आहे.

महाराष्ट्रातल्या पूरग्रस्तांसाठी बॉलिवूड कलाकारांची मदत का नाही? मनसे चित्रपट अध्यक्ष अमेय खोपकर यांचा सवाल

अमिताभ बच्चन यांनी देखील पूरग्रस्तांना मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. दरम्यान मराठी सिने आणि नाट्य कलाकारही पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे आले आहेत. आर्थिक मदतीबरोबरच, धान्य, जीवनावश्यक वस्तूची मदतही त्यांनी पूरग्रस्तांना केली आहे. सुबोध भावे, श्रेयस तळपदे, सई ताम्हणकर, जितेंद्र जोशी, सिद्धार्थ जाधव यांसारख्या असंख्य कलाकारांनी मदत केली आहे.