पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आमिरचा 'दंगल' ठरला या दशकातील ब्लॉकबस्टर चित्रपट - Yahoo India

आमिर खान

याहू इंडियाकडून या दशकातल्या ब्लॉकबस्टर चित्रपटांची यादी जाहीर करण्यात आली. या यादीत आमिर खानचा 'दंगल' चित्रपट पहिल्या क्रमांकावर आहे. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटानं जगभरातून दोन हजार कोटींचा गल्ला जमवला होता. 

'रफ अँड टफ' लूकसाठी अशी घेतली मोहन जोशींनी मेहनत

कुस्तीपटू  फोगाट बहिणींवर हा चित्रपट  आधारलेला आहे. मुली मुलांपेक्षा कोणत्याच बाबतीत मागे नाही असं म्हणत आपल्या मुलींना कुस्तीचं प्रशिक्षण देणाऱ्या आणि त्यासाठी जगाशीही दोन हात करणाऱ्या वडिलांची आणि फोगाट बहिणींच्या जिद्दीची ही कथा आहे. नितेश तिवारी दिग्दर्शित या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली होती. 

उणे ३ अंश से. तापमानात चित्रीकरण करणाऱ्या बच्चन यांचा 'कूल' लूक

या चित्रपटाचा समावेश याहू इंडियाच्या गेल्या दहा वर्षांतील ब्लॉकबस्टर चित्रपटाच्या यादीत करण्यात आला आहे. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर सलमानचा बजरंगी भाईजान आहे. या व्यतिरिक्त पीके, सुलतान, टायगर झिंदा है, धूम ३, संजू, वॉर, चेन्नई एक्स्प्रेस आणि दबंग या चित्रपटांचा समावेशही या यादीत आहे.