पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'मोगुल'साठी आमिरचा पुन्हा होकार, गुलशन कुमार यांच्या भूमिकेत

आमिर खान

मी टुच्या वादामुळे थांबवलेल्या 'मोगुल' चित्रपटाचं काम आता लवकरच मार्गी लागणार आहे. कारण या चित्रपटासाठी आमिरनं पुन्हा एकदा होकार दिला आहे. 'मोगुल' हा चित्रपट टी- सिरिजचे सर्वेसर्वा गुलशन कुमार यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटात खुद्द आमिर खान गुलशन कुमार यांची भूमिका साकारत आहे. 

ऐश्वर्यावरील वादग्रस्त मीम्सनंतर पहिल्यांदाच विवेक-अभिषेक आमने-सामने

२०१८ साली आलेल्या मी टु वादळाचा फटका 'मोगुल'लाही बसला होता. या चित्रपटाचे पूर्वीचे दिग्दर्शक सुभाष कपूर यांच्यावर मीटुचे आरोप होते. या आरोपांनंतर आमिरनं चित्रपटासाठी नकार दिला. मीटुचे आरोप असलेल्या दिग्दर्शकासोबत काम करणार नाही असं आमिरनं स्पष्ट केलं होतं. 

वयाच्या ५२ व्या वर्षीही तरुण दिसण्यामागच रहस्य सांगतोय अक्षय

मात्र आता आमिरनं चित्रपटासाठी पुन्हा एकदा होकार दिला. 'मोगुल' मध्ये गुलशन कुमार यांची भूमिका साकारत असल्याच्या वृत्ताला आमिरनं अधिकृत दुजोरा दिला आहे. सध्या मी लाल सिंह चड्ढाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. या चित्रपटाचं काम पूर्ण झाल्यानंतर मग 'मोगुल' कडे  वळेन असंही आमिरनं सांगितलं. आमिरआधी या चित्रपटासाठी अक्षयला विचारण्यात आलं होतं. मात्र अक्षय कुमारनं मोगुलला नकार दिला.