पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आमिर खाननं जागेसाठी मोजले तब्बल ३५ कोटी

आमिर खान

बॉलिवूड अभिनेता आमिर खाननं सांताक्रूझमध्ये तब्बल  ३५ कोटी रुपये मोजून जागा खरेदी केली आहे.  डी.एन.एच्या वृत्तानुसार आमिरनं ही जागा व्यावसायिक कारणासाठी खरेदी केली आहे. आमिरनं प्रति स्वेअर फूटसाठी ३७,८५४ रूपये  एवढी किंमत मोजली आहे. सांताक्रुझ पश्चिम इथल्या प्राईम प्लाझा इमारतीत त्यानं ही जागा घेतली आहे. या जागेसाठी  २.१ कोटी रूपये स्टॅम्प ड्युटीही आमिरनं भरली  आहे. 

हृतिकचं कुटुंब सुनैनाला मारहाण करतं, कंगनाच्या बहिणीचा आरोप

आमिरनं त्याच्या घरापासून जवळच ही जागा घेतली आहे.  ‘आमिर खान प्रोडक्शन प्रायव्हेट लिमिटेड’ या नावानं या जागेसाठी नोंदणी करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त आमिरनं पार्किंगसाठीही जागा विकत घेतली आहे. या जागी  आमिर त्याचं कार्यालय उभारेन अशाही चर्चा आहेत. 

'मिस इंडिया युनिव्हर्स'सोबत कोलकात्यात गैरवर्तन, ७ जणांना अटक

सध्या आमिर त्याच्या आगामी चित्रपटाच्या कामात व्यग्र आहे. आमिर 'लाल सिंग चड्ढा' या  चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचं चित्रीकरण सुरू होण्यापूर्वीची पूर्वतयारी सुरू आहे. 'ठग्ज ऑफ हिंदोस्थान'च्या अपयशानंतर या चित्रपटाकडे आमिरनं पूर्णपणे आपलं लक्ष केंद्रीत करण्याचं ठरवलं आहे.