पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

चांगले चित्रपट नेहमी स्टारकिड्ससाठीच, अभिनेत्रीची खंत

आहाना कुमरा

बॉलिवूडमध्ये स्टारकिड्सनां प्रथम संधी दिली जाते, तर इतर कलाकारांना मात्र संधी नाकारली जाते यावर अनेकांनी आवाज उठवला आहे. यात खुद्द कंगना रणौतचाही समावेश होता. बॉलिवूडमध्ये सुरू असलेल्या या विषमतेवर अभिनेत्री आहाना कुमरानंही नाराजगी व्यक्त केली आहे. 

सुपरहिट 'स्त्री' चित्रपटाचा पार्ट २ आणि ३ येणार

'या क्षेत्रात केवळ स्टारकिड्नां चांगल्या संधी मिळतात. चांगल्या आणि मोठ्या चित्रपटांसाठी नेहमीच त्यांच्या नावाचा विचार केला जातो. मात्र आमच्यासारख्या कलाकारांना काम मिळवण्यासाठी झगडावं लागतं. चांगल्या भूमिकांसाठी नेहमीच  सेलिब्रिटींच्या मुलांचा विचार केला जातो. त्यातून जे काही उरतं ते आमच्यासारख्या कलाकारांच्या वाट्याला येतं', अशी खंत आहानानं बोलून दाखवली. 

'बाला'चे लेखक आणि निर्मात्यांवर स्वामित्व हक्काचा भंग केल्याचा आरोप

 'चित्रपटसृष्टीत पुरुष कलाकारांच्या वाट्याला अनेक भूमिका येतात पण अभिनेत्रींच्या बाबतीत तसं नसतं.  छिछोरे, ८३ सारख्या चित्रपटांत अभिनेते जास्त मात्र अभिनेत्रींची संख्या केवळ एक हा दुजाभाव आहे', असंही आहानानं सांगितलं.  आहाना ही २००९ पासून या क्षेत्रात आहे. 'लिपस्टिक अंडर माय बुरखा' चित्रपटामुळे ती सर्वाधिक चर्चेत आली.