पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'ही माझ्या गालावर सणसणीत चपराक'

प्रकाश प्रकाश

लोकसभा निवडणुकीत  कर्नाटकातील बेंगळुरू मध्य मतदार संघातून अपक्ष  निवडणूक लढवणारे अभिनेते प्रकाश राज पराभूत झाले. माझ्या गालावर ही सणसणीत चपराक  आहे.  जितका अपमान, ट्रोलिंग आणि अपशब्द माझ्या वाट्याला येतील तितक्याच ताकदीनं मी धर्मनिरपेक्ष भारतासाठी माझा लढा कायम सुरू ठेवत असं ट्विट त्यांनी केलं.

कठीण प्रवासाला आता सुरूवात झालीये असं म्हणत त्यांनी आपली खंत व्यक्त केली आहे. प्रकाश राज हे दक्षिणेकडील प्रसिद्ध अभिनेते आहेत. बॉलिवूडमधल्या अनेक चित्रपटात त्यांनी खलनायक रंगवला आहे. दक्षिणेकडे जितकी लोकप्रियता अभिनेता म्हणून त्यांच्या वाट्याला आली तेवढी लोकप्रियता त्यांना राजकारणी  म्हणून  मिळाली नाही.  त्यांनी अपक्ष म्हणून  निवडणूक लढवणार असल्याचं  जाहिर करताच अनेकांचं लक्ष निकालाकडे होते. मात्र गुरूवारी  निकालाचे  कल स्पष्ट  झाले. आपला पराभव होत असल्याचं लक्षात येताच प्रकाश राज मतमोजणी केंद्रावरून निघून गेले  त्यानंतर ट्विट  करत यांनी  आपली नाराजी व्यक्त केली.

प्रकाश राज हे कट्टर भाजप विरोधी  अभिनेता  म्हणून ओळखले जातात. परिणामांची तमा न बाळगता त्यांनी अगदी बेधडकपणे सरकारविरोधात मतं मांडली आहेत.  मोदींवर टीका करण्यापासून ते  कधीही घाबरले नाही. इतकंच नाही  तर मोदींमुळे आपल्याला चित्रपटसृष्टीत काम मिळणं बंद झाल्याचा  आरोप प्रकाश राज यांनी केला होता.