पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सलमान खानच्या 'भारत' विरोधात याचिका दाखल

भारत

अभिनेता सलमान खानच्या 'भारत' चित्रपटाविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. 'भारत' या शब्दाचा व्यावसायिक कारणासाठी वापर केला आहे तसेच देशाच्या राजमुद्रा आणि नावे (गैरवापर रोखणे) कायद्यातील कलम तीनचे उल्लंघन करण्यात आले असल्याचा युक्तिवाद याचिकाकर्त्यानं याचिकेत केला आहे.

सलमानचा 'भारत' चित्रपट पुढील आठवड्यात प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन सलमान खान, कतरिना कैफकडून सुरू आहे. मात्र हा चित्रपट आता वादात सापडला आहे. याचिकाकर्त्यानं चित्रपटाच्या नावाबरोबरच चित्रपटाच्या संवादातही बदल करण्याची मागणी केली  आहे. या चित्रपटात सलमानचं नाव 'भारत' असून 'भारत' या पात्रानं स्वत:च्या नावाची तुलना ही देशाशी केली आहे ज्यामुळे असंख्य देशभक्तांच्या भावना दुखावल्या गेल्या असल्याचं यात म्हटलं आहे. 

'भारत' हा चित्रपट कोरियन चित्रपट 'अॅन ओड टु  माय फादर' या चित्रपटावर आधारलेला आहे. ५ जूनला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. गेल्या काही महिन्यांपासून हा चित्रपट प्रियांका चोप्रा आणि सलमान मधल्या वादामुळे चर्चेत आहे. सुरूवातीला प्रियांका चोप्रा या चित्रपटात प्रमुख भूमिकेत होती. मात्र चित्रीकरणं सुरू व्हायला आठवड्याभराचा अवधी असताना तिनं या चित्रपटातून माघार घेतली. ऐनवेळी कतरिना कैफची निवड चित्रपटासाठी करण्यात आली.