पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'लाल सिंग चड्ढा'मधला आमिरचा लूक व्हायरल

लाल सिंग चड्ढा

आमिर खान बॉलिवूडमधला 'मिस्टर परफेक्शनिस्ट' म्हणून ओळखला जातो. प्रत्येक भूमिकेसाठी आमिर खूपच मेहनत घेतो, भूमिकांमध्ये नाविन्यूपर्ण प्रयोग करायला आमिरला खूपच आवडतात. आमिरचा  'लाल सिंग चड्ढा' पुढील वर्षी प्रदर्शित होत आहे. या चित्रपटातील आमिरचा लूक सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

आयुष्मानच्या 'बाला'ची बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई

आमिर  'लाल सिंग चड्ढा'मध्ये एक शीख व्यक्तीरेखा साकारत आहे. ही व्यक्तीरेखा साकारण्यासाठी आमिरनं २० किलो  वजनही घटवलं आहे. या वेशातील आमिरचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

बेल बॉटम : गुप्तहेरांच्या विश्वातली थरारक कथा, अक्षय प्रमुख भूमिकेत

अभिनेता अतुल कुलकर्णी यानं चित्रपटाची कथा लिहिली आहे. हॉलिवूड चित्रपट 'फॉरेस्ट गम्प'चा हा अधिकृत रिमेक आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून 'लाल सिंग चड्ढा'च्या चित्रीकरणाला सुरूवात झाली आहे. अभिनेत्री करिना कपूर या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. २०२० मध्ये नाताळात हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.