पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

काळजाचा थरकाप उडवणारा 'भूत'

भूत

करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शन अंतर्गत 'भूत' चित्रपटाची निर्मिती होणार आहे.  'भूत' चित्रपटाचे अनेक भाग येणार आहेत. यातला पहिला भाग  'भूत- द हाँटेड शिप' १५ नोव्हेंबर २०१९ मध्ये प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट हॉरर कॉमेडी नसून पूर्णत: थरकाप उडवणारा भयपट असणार आहे.

आतापर्यंत करणच्या धर्मा प्रोडक्शननं अनेक रोमँटीक चित्रपटांची निर्मिती केली आहे मात्र पहिल्यांदाच धर्मा प्रोडक्शन भयपट आणणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाचे आणखी काही भागही येत्या काही वर्षांत प्रदर्शित करण्याचा निर्णय  करणनं घेतला  आहे.

या चित्रपटाचं पहिलं पोस्टर लाँच करण्यात आलं असून पोस्टर पाहून  चांगला प्रतिसाद बॉलिवूडमधून मिळत आहे. या चित्रपटात विकी कौशल प्रमुख भूमिकेत आहे. विकीनं आतापर्यंत अनेक चित्रपटात काम केलं. त्याचा 'उरी द सर्जिकल स्टाईक' हा चित्रपट तर २०१९ मधला सुपरहिट चित्रपट ठरला. आता 'भूत' या चित्रपटाच्या रुपानं तो एक वेगळ्याच भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  त्यामुळे विकीचे चाहते खूपच उत्सुक आहेत.

भानू प्रताप सिंग या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार आहेत त्यामुळे  'भूत- द हाँटेड शिप'  चित्रपटाचे ते खऱ्या अर्थानं कॅप्टन  असणार आहेत.